जळगाव : घरासमोर लावलेल्या दुचाकीचे हॅँडल रिक्षात अडकल्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या बॅँक कर्मचारी व त्यांच्या आईला रिक्षा चालकाने दगड व विटांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता शिवाजी नगरातील नवीन घरकुल भागात घडली. याप्रकरणी रिक्षा चालक गज्या उर्फ गजानन विलास बाविस्कर याच्याविरुध्द बुधवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खासगी बॅँकेत नोकरीला असलेले निलेश हिरालाल साळुंखे हे शिवाजी नगरातील नवीन घरकुल येथे राहतात. त्यांनी नुकतीच नवीन दुचाकी घेतली आहे. दुचाकी घरासमोर लावून साळुंखे हे बाहेर गेले होते. त्यावेळी घराशेजारी राहणारा राज्या हा रिक्षा घेवून आला असता त्याच्या रिक्षात दुचाकीचे हॅँडल अडकले. हा प्रकार पाहून साळुंखे यांची प}ी पूजा यांनी त्याला दुचाकीचे नुकसान होईल असे विचारले. त्यावर त्याने प}ी पूजा व आई आशाबाई या दोघांना घरात येवून शिवीगाळ केली. तसेच गच्चीवर जावून दगड व विटांचा मारा सुरु केला. यात आशाबाई यांना मानेवर व पायावर जखम झाली. या घटनेत गज्या याने साळुंखे व त्यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली आहे.हा प्रकार समजल्यानंतर साळुंखे यांनी घरी येवून त्याला जाब विचारला असता त्याने दरवाजा बंद केला व गच्चीवर जावून पुन्हा दगड व विटा मारुन फेकल्या. डोक्यात दगड लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत साळुंखे यांना आई व प}ीने शहर पोलीस स्टेशनला आणले. तेथून नंतर पोलिसांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले.
रिक्षा चालकाकडून बॅँक कर्मचा:याला दगड, विटांनी मारहाण
By admin | Published: February 15, 2017 11:22 PM