लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील बडगुजर समाज उन्नती मंडळ व आई चामुंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपला गणपती आपल्या हाताने बनवूया आणि पर्यावरण रक्षण करूया ही कार्यशाळा राबवण्यात आला़ यात 37 मुले आणि त्यांचे पालक यांनी सहभाग नोंदवला़जगताप लॉन्स येथे हा उपक्रम पार पडला़ यावेळी 37 मुलांसह पालकांनी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविल्या. कार्यशाळेत शहादा येथील रविंद्र मोहन बडगुजर व रोहिणी बडगुजर यांनी प्रशिक्षण दिल़े मूर्ती तयार करण्याचे विविध बारकावे मुलांना दोघांनीही समजावून दिल़े उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता बडगुजर, सचिव रेणूका बडगुजर, पंडीत बडगुजर, भाईदास बडगुजर, भटू जगन्नाथ बडगुजर, देविदास बडगुजर, दिनेश बडगुजर, विजय जगन्नाथ बडगुजर, पंकज प्रभाकर बडगुजर, सुनिता दिनेश बडगुजर, शुभांगी दिलीप बडगुजर, मनिषा विजय बडगुजर, निशा देविदास बडगुजर, सुनिता पंकज बडगुजर, अनिता भटू बडगुजर, राधा विजय बडगुजर उपस्थित होते. प्रसंगी बोलताना रविंद्र बडगुजर यांनी पर्यावरण संवर्धनाबाबतचे एक पाऊल म्हणून आपण शाडू मातीचा पर्यावरण पूरक गणपती तयार केला पाहिज़े शहादा तालुक्यात पाच वर्षापासून शाडू माती, कागदाचा लगदा व नारळाच्या कुच्च्या तसेच पावित्र्याचे प्रतिक म्हणून त्यात पंचामृत, पंचगण्य, गंगाजल, भगवतांचे अभिषेक जल टाकून गणेश मूर्ती तयार करत आह़े हे सर्व पर्यावरण पूरक असल्याने सर्वानीच त्यात सहभाग घ्यावा असे सांगितल़ेसूत्रसंचालन दिलीप बडुगजर यांनी केले. कार्यशाळेस नितीन जगताप, पंकज मराठे, प्रताप जगताप यांनी सहकार्य केल़े
गणेशमूर्ती बनवण्यात दंगले चिमुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:15 PM