नंदुरबार : नंदुरबारात साधारणत 15 ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने यामुळे खरिप हंगामातील 2 लाख 41 हजार 761 हेक्टरावरील पिकं धोक्यात आलेली आहेत़ त्यात कापूस पिकाची स्थिती चिंताजनक आह़े एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची पेरणी करण्यात आलेली आह़े जिल्ह्यात सुमारे 89 टक्के खरिप पेरण्या आटोपल्या आहेत़ यंदाच्या पावसाळ्यात 29 मे रोजी मान्सून राज्यात दाखल होणार असल्याने आनंदाचे वातावरण होत़े जुन महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बहुतेक शेतक:यांनी खरिपाच्या पेरण्या आवरुन घेतल्या होत्या़ परंतु त्यानंतर साधारणत दोन आठवडे पावसाने दडी मारली होती़ त्यानंतर पावसाची रिपरिप सुरु झाल्याने पिकांची स्थिती ब:यापैकी होती़ परंतु त्यानंतर जुलै महिन्यातील बहुतेक दिवस कोरडे गेल्याने पिकांना धोका निर्माण झाला होता़ तसेच ऑगस्ट महिनादेखील कोरडाच जाणार असल्याने खरिप पिके हातून जाताय की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली आह़े जिल्ह्यातील एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आलेली आह़े तालुकानिहाय पाहिले असता, नंदुरबार 39 हजार 480 हेक्टर, नवापूर 5 हजार 121 हेक्टर, शहादा 47 हजार 488, तळोदा 8 हजार 420 हेक्टर, अक्राणी 480 हेक्टर, अक्कलकुवा 3 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आह़े तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पूनर्वसन आदी परिसरात पिकपाणी बरे असले तरी, नंदुरबार तालुका, शहाद्यातील काही भाग वगळता इतर बहुतांश ठिकाणावरील पिक धोक्यात आलेली आहेत़ अशीच परिस्थिती अक्कलकुवा, धडगाव आदी परिसराचीसुध्दा आह़े शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गणित हे खरिप हंगामावरच अवलंबून असत़े गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरडय़ा दिवसांची संख्या वाढली असल्याने साहजिकच याचा परिणाम उत्पन्नावर जाणवनार आह़े पुढील आठ ते दहा दिवस पाऊस न परतल्यास जिल्ह्यातील खरिप हंगाम धोक्यात येणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े पावसाअभावी अनेक शेतांमध्ये जमिन ओसाड झाल्याने जमिनीस तडे गेले असल्याची भिषण स्थिती निर्माण झालेली आह़े राज्यभरातील जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबारात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आलेली आह़े कापूस सध्या वाढीच्या अवस्थेत आह़े परंतु नंदुरबार तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असल्याने साहजिकच कापसाची वाढ खुंटली असल्याची स्थिती दिसून येत आह़े मागील वर्षी कापसाला बोंडअळीने खाल्ले होत़े त्यातून शेतक:यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होत़े कापूस फुलावर असताना अशा प्रकारे पाण्याअभावी वाढ खुंटली असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत़ केळी, पपई पिकही धोक्यातशहादा, तळोदा तालुक्यासह नंदुरबार तालुक्यातीलही काही भागात केळी व पपई पिक घेण्यात येत असत़े परंतु पाउसपाणी नसल्याने ही पिकही धोक्यात आलेली आहेत़ हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून केळी तसेच पपईकडे पाहिले जात असत़े परंतु पावसाने गेल्या तीन आठवडय़ांपासून दडी मारली असल्याने शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ ऑगस्ट महिन्यात तरी किमान पाऊस परतावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबार तालुक्यात पावसाअभावी पाणी पातळीत अधिकच घट होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत़
नंदुरबारातील अडीच लाख हेक्टरवरील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 3:11 PM