लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चरणमाळ घाटात एकाची लूट करुन फरार असलेल्या संशयितास एलसीबीच्या पथकाने उचीशेवडी ता़ नवापुर शिवारातील शेतातून ताब्यात घेतल़े एलसीबीचे पथक तीन महिन्यांपासून संशयिताच्या मागावर होत़े चरणमाळ ता़ साक्री येथील गुलाब छगन मावची हे दूध डेअरीचे पैसे घेऊन जात असताला 12 मार्च रोजी त्यांची अज्ञात तिघांनी लूट केली होती़ याप्रकरणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्याकडून तपास सुरु होता़ दरम्यान रस्ता लुटीचा मुख्य सूत्रधार किशोर देवज्या गावीत हा उचीशेवडी येथील शेतात लपून बसला असल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल दिनक गोरे व आनंदा मराठे हे शेतात काम मागण्याच्या बहाण्याने गेले होत़े परंतू किशोर गावीत याने दोघांच्या तावडीतून सुटून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता़ दरम्यान एलसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात तो अलगद फसला होता़ त्याची चौकशी केल्यानंतर त्याने योहान गावीत, रविदास गावीत व प्रभू होल्या अशा तिघांची नावे सांगून त्यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली़ चारही संशयितांनी सहा ते सात महिन्यांपूर्वी साक्री तालुक्यातील दहिवेल येथे कांदा व्यापा:यास तसेच गुजरात राज्यातील उच्छल येथील एका व्यापा:यास जबरीने मारहाण करुन साडेआठ लाख रुपयात लुटले होत़े चौघांविरोधात उच्छलसह नवापुर आणि विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत़ पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ ढवळे, दिपक गोरे, भटू धनगर, संदीप लांडगे, राहुल भामरे, मोहन ढमढेरे, जितेंद्र ठाकूर यांनी ही कारवाई केली़
रस्तालूटीतील आरोपीस उचीशेवडीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:06 PM