शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

रोहयोची यंदा ५३ हजार कामे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रोजगार हमी योजनेची १,२४६ कामे मंजूर करण्यात आली असून यापूर्वी मंजूर २३,२२० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रोजगार हमी योजनेची १,२४६ कामे मंजूर करण्यात आली असून यापूर्वी मंजूर २३,२२० आणि अपुर्ण असलेली २८ हजार ८६६ कामे अशी एकुण तब्बल ५३ हजार ३३२ कामे यावर्षी उपलब्ध आहेत. वर्षभर पुरतील एवढी कामे उपलब्ध असून मजुरांनी स्थानिक पातळीवर कामाची मागणी केल्यास लागलीच ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने सर्वत्र रोजगाराची वाणवा आहे, अनेक स्थलांतरित मजूर आपापल्या गावात परतले आहेत. अश्या सर्व ग्रामिण कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कामांबाबत माहिती देताना नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मजुरांना आपल्या गावातच काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम पंचायत यंत्रणा त्याचप्रमाणे राज्य शासनाचा वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत विविध कामांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो.मजुरांनी केलेल्या कामाचा मोबदला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३ लाख ५ हजार ४७७ एवढे जॉब कार्ड वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ३२ हजार १४५ जॉबकार्ड कार्यान्वित आहेत. जिल्ह्यात १ लाख २६ हजार ३३२ जॉब कार्ड पडताळणी करण्यात आलेले असून, त्याअंतर्गत २ लाख २३ हजार ४६२ मजूर कार्यान्वित आहेत.आजच्या परिस्थितीत एकट्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, सिंचन विहीर, शौचालय, शोषखड्डे, गुरांचा गोठा अशी कामे प्रस्तावित असून, सार्वजनिक कामांमध्ये रस्ते, पाझर तलाव गाळ काढणे, अंगणवाडी इमारत बांधकाम, पिण्याच्या पाण्याची विहीर, लहान नाल्यांवर जाळी बंधारे (गॅबीअन स्ट्रक्चर), मातीनाला बांध बांधकाम व दुरुस्ती अशी कामे प्रस्तावित आहेत.२०१९-२० च्या प्रस्तावित कामांपैकी २८ हजार ८६६ कामे अपूर्ण आहेत, त्यातून १६ लाख ८४ हजार १३२ मनुष्य दिवस एवढे काम उपलब्ध आहे. तर इतर २३ हजार २२० कामे नव्याने मंजूर आहेत व त्यातून १६ लाख २२ हजार ६८० मनुष्य दिवस एवढे काम उपलब्ध आहे.कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर १,२४६ सार्वजनिक कामे मंजूर करण्यात आली असून, त्यातून ९ लाख ५० हजार ४६९ मनुष्य दिवस एवढे काम उपलब्ध होणार आहे. अश्या प्रकारे या सर्व ३ हजार ३३२ कामांमधून ४२ लक्ष ५७ हजार ३११ मनुष्य दिवस एवढी कामे उपलब्ध आहेत. २०२०-२१ या वषार्साठी ३० लाख १४ हजार ५१७ मनुष्य दिवस एवढे काम उपलब्ध करून देण्याचे लक्ष देण्यात आले होते.मात्र, जिल्ह्यात आजच दिलेल्या लक्षांकापेक्षा अधिकची कामे उपलब्ध आहेत व इतर अनेक कामे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील मजुरांसाठी उपलब्ध कामांची माहिती देतांना त्यांनी सांगितले की, मागेल त्याला काम या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या धोरणानुसार जिल्ह्यातील मजुरांना वर्षभर पुरतील एवढी कामे उपलब्ध आहेत. नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर असलेली आपली घरकुले पूर्ण करून घ्यावीत व रोजगार हमी योजनेच्या कामाचे ई-मस्टर प्राप्त करून घ्यावेत. त्याचबरोबर प्रत्येक गावात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक कामांबाबत ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध करून घ्यावा.अशा कामांवर जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. घराबाहेर पडताना तोंडाला रुमाल बांधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.