नंदुरबार : ‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे..’ महात्मा गांधींच्या या लोकप्रिय भक्तीगिताच्या उक्तीप्रमाणे येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने भोणे रस्त्यावरील आदिवासी हट्टीत मानवतेची दिवाळीचा आगळा वेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमाने ग्रामस्थांच्या चेह:यावर दिवाळीचा खरा आनंद पाहायला मिळाला.नंदुरबार शहरातील भोणे रस्त्याला लागून साधारणत: दीडशे कुटुंब निवासाला असलेली आदिवासी हट्टी आहे. या हट्टीत रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे यंदाची दिवाळी साजरा करण्यात आली. त्यासाठी दोन दिवसापासूनच या हट्टीत रोटरीच्या पदाधिका:यांनी तेथील कुटुंबांशी जवळीक साधून त्यांचे दु:ख हलके करण्याचा प्रय} केला. त्यासाठी सर्व घरांच्या दर्शनी भागात रंगरंगोटी केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांच्या सोबत दिवाळी साजरा केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उद्योगपती देवेंद्र जैन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष शब्बीर मेमन, सचिव प्रितेश बांगड, मदनलाल जैन, नीलेश तवर हे उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सांगितले की, धडपड व सेवेचा ध्यास असणारी लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चळवळीला गती येते. त्याची प्रचिती रोटरी क्लब ऑफ नंदनगरीला पाहून येते. या वेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमांतर्गत रोटरी नंदनगरीतर्फे भोणे फाटा परिसरातील वसाहतीतील गरीब कुटूंबाच्या 130 घरांना रंगकाम करुन दिले. तसेच घरोघरी जावून आरोग्य तपासणी करुन 300 विटॅमीन व कॅल्शीयमची औषधी देण्यात आली. तसेच दिवाळीसाठी मिठाई, फराळ व चॉकलेट घरोघरी वाटप करण्यात आले. 500 पेक्षा अधिक महिलांना साडय़ा तसेच लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले. तेथील विद्याथ्र्याना 500 जोडी चप्पलही वाटप करून 500 जणांना अन्नदान वाटप करण्यात आले. यावेळी उपक्रमास सहकार्य करणारे डॉ.विशाल चौधरी, मनोज गायकवाड, मनिष बाफणा, शैलेश जाधव, युनुसभाई सैय्यद, गिरीष जैन, हर्षद मेमन यांचा जिल्हाधिका:यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष शब्बीर मेमन यांनी केले. सूत्रसंचालन नागसेन पेंढारकर तर आभार जितेंद्र सोनार यांनी मानले. कार्यक्रमासाठी क्लबचे सदस्य नीलेश तवर, वसंत रावल, इसरार सैय्यद, हाकीम लोखंडवाला, नंदु सोनी, जय गुजराथी, दिनेश साळुंखे, अॅड.प्रेमानंद इंदिस, राजनसिंग चांदेल, कैलास मराठे, अपूर्व पटेल आदींनी परिश्रम घेतले.
रोटरीच्या मानवतेच्या दिवाळीने भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:04 AM