लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नाशिक विभागीय आयुक्तालयाकडे तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत काम करणा:या शासकीय आश्रम शाळेतील कर्मचा:यांना विश्वासात न घेता परस्पर कमी नावे पाठविण्यात आल्याने या कर्मचारींनी बुधवारी रात्री प्रकल्प कार्यालयावर मोर्चा नेऊन तेथे अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले. या कर्मचा:यांना प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळच ताटकळत उभे केल्याने कर्मचा:यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शेवटी प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांनी कर्मचा:यांना विश्वासात घेवून पुन्हा यादी पाठविण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचारी तेथून माघारी आले. दरम्यान नाशिक येथे पद यात्रेने आत्मदहन करण्यासाठी कर्मचारी गुरूवारी सकाळी तळोद्याहून रवाना झाले होते. राज्यातील आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळेत संपूर्ण राज्यातून साधारण चार हजारापेक्षा अधिक कर्मचारी गेल्या 10 ते 15 वर्षापासून काम करीत आहेत. एकटय़ा तळोदा प्रकल्पात साधारण 790 कर्मचा:यांचा समावेश आहे. हे कर्मचारी आपल्याला कायम करावे यासाठी शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडे सातत्याने लढा देत आहेत. गेल्या वर्षीदेखील कर्मचा:यांनी अक्कलकुवा ते नाशिक असा 250 किलोमीटर अंतराचा नाशिक येथे आपल्या कुटुंबासह बि:हाड मोर्चा नेला होता. तब्बल सात ते आठ दिवस तेथेच आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. तेव्हा आदिवासी विकास प्रशासनाने सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर वर्षभर याबाबत ठोस अशी कार्यवाही झाली नाही. आता पुन्हा कर्मचा:यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने पुन्हा अशा कर्मचा:यांच्या याद्या संबंधित प्रकल्पामार्फत मागविण्यात आल्या आहेत. तळोदा प्रकल्पाने सुद्धा आदिवासी विकास विभागाकडे याद्या पाठविल्या आहेत. तथापि कर्मचा:यांपेक्षा कमी नावे पाठविण्याचा आरोप होता. त्यामुळे या कर्मचा:यांनी अक्कलकुव्याहून-नाशिककडे जातांना तळोदा प्रकल्पावर बुधवारी रात्री मोर्चा काढला. त्या वेळी कर्मचा:यांच्या मोर्चास पोलिसांनी प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ रोखले. संतप्त कर्मचा:यांनी प्रकल्पाधिकारी गौडा यांना कर्मचा:यांच्या समोर चर्चा करण्याचा हट्ट धरला होता. त्यामुळे वातावरणही तणावपूर्ण बनले होते. शेवटी प्रकल्पाधिकारी मोर्चाच्या समोर आल्यानंतर यादीबाबत त्यांना कर्मचा:यांनी चांगलेच धारेवर धरले होते. प्रकल्पातील कर्मचारी सहकार्य करीत नाही, तब्बल एक-दीड तास त्यांच्याशी चर्चा झाली. शेवटी त्यांनी कर्मचा:यांना विश्वासात घेवून पुन्हा यादी पाठविण्याची हमी दिल्यानंतर हे कर्मचारी माघारी परतले. प्रकल्पातर्फे त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर गुरूवारी कर्मचा:यांनी हातोडामार्गे नाशिककडे प्रस्थान केले.
रोजंदारी कर्मचा:यांची ‘प्रकल्प’वर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:14 PM