लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वे विभागात नोकरीस असल्याने दरमहा पैसे द्यावेत यासाठी होणा:या छळाला कंटाळून सुनेने पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीत वास्तव्यास असलेल्या मिना राकेश कडोसे यांचे पती राकेश जुम्मल कडोसे,सासू प्रमिला जुम्मल कडोसे, दीर दीपक जुम्मल कडोसे सर्व रा़ गोंधळी गल्ली, नंदुरबार यांच्याकडून 2016 पासून वेळोवळी शारिरिक व मानसिक छळ करण्यात येत होता़ पती राकेश याच्याकडून वारंवार पैशाची मागणी करणे, सासूकडून दरमहा 10 हजार रूपये द्यावेत यासाठी होणार छळ आणि दीराकडून होणारी मारहाण करून जीवे ठार मारण्याची दिली जाणारी धमकी, याला कंटाळून संबधित विवाहितेने पोलीसात फिर्याद दिली आह़े
रेल्वेत नोकरीस असलेल्या सूनेचा सासरच्यांकडून छळ : नंदुरबार शहरातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:45 PM