लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्ह्याबाहेरील कारखान्यांवर अवलंबून असलेल्या तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे गेल्या वर्षी उसाची नोंद केली नसलेल्या शेतक:यांना यंदा उसतोड लावण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आह़े अर्थात स्थानिक कारखानदारांनी उसतोड लावून देण्याचे आश्वासन दिले आह़े परंतु तरीही सध्या नोंद असलेल्या उसाचीच तोड प्रथम केली जात आह़े यामुळे तळोद्यातील बहुतेक शेतक:यांचा बिगर नोंदीचा ऊस पडून आह़े गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातील संजीवनी, कोपरगांव, कोळपेवाडी, रानवड, संगमनेर, व्दारका, विठेवाडी येथील कारखान्यांबरोबरच गुजरात मधील महुवा, दाद:या, मांडवी, मरोली, वलसाड, कुकरमुंडा अशा डझनभर कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस मोठय़ा प्रमाणात नेला होता़ या कारखान्यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने व खांडसरींपेक्षा साधारणत शंभर ते दोनशे रुपये अधिक दर दिल्यामुळे शेतक:यांचा कल तिकडेच वाढला होता़ एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कारखान्यांकडे नोंद केलेला उसदेखील त्यांनाच दिला होता़ साहजिकच गेल्या वर्षी कारखाने व खांडसरींच्या गाळपावर प्रचंड परिणाम होऊन हंगामदेखील लवकर संपला होता़ परंतु यंदाही बाहेरील कारखाने पुन्हा आपल्याकडे येतील या आशेवर जिल्ह्यातील शेतक:यांनी उसाची प्रचंड लागवड केली़ जवळपास गेल्या वर्षाच्या तुलनेत हजारो हेक्टर क्षेत्र वाढल़े शिवाय जिल्ह्यातील तिन्ही कारखान्यांकडे नोंदसुध्दा केली नाही़ मात्र यंदा राज्यभरात उसाचे विक्रमी उत्पादन वाढल्यामुळे साखर कारखानेही पूर्ण क्षमतेने गाळप करीत आहेत़ शिवाय हे कारखाने व खांडस:या आपल्याकडे नोंद केलेल्या उसालाच प्राधान्य देत आहेत़ त्यामुळे बिगर नोंद केलेल्या ऊस उत्पादक शेतक:यांची चांगलीच गोची झाली आह़े कारण बाहेरील कारखाने यंदा जिल्ह्यात आले नाहीत़ त्याचा परिसरातच मुबलक प्रमाणात उसाची लागवड झाली आह़े त्यामुळे त्यांनी इकडे पाठ फिरवल्यामुळे शेतकरीही संकटात सापडल्याची व्यथा आह़े अशा बहुतेक शेतक:यांनी सातपुडा साखर कारखान्याकडे उसतोडीसाठी कच्ची नोंद केली आह़े कारखाने नोंदणीच्या उसाचे गाळप संपल्यानंतर घेण्याचीही संमती दर्शवली आह़े मात्र नोंदलेल्या उसाचे क्षेत्र अजून मोठया प्रमाणात बाकी असल्याने आपला ऊस केव्हा तोडला जाईल? या विवंचनेत शेतकरी सापडला आह़े अनेक शेतक:यांच्या क्षेत्रावरील उसाची वेळेवर तोड होत नसल्यामुळे त्याचे वजनही घटणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े शिवाय, एकूणच उसाच्या तोडीबाबत शेतक:यांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आह़े त्या मुळे प्रशासनाने शेतक:यांची ही संभ्रमता दुर करण्याची मागणी करण्यात येत आह़े
तळोद्यातील ऊस उत्पादकांची व्यथा : बहुतेक शेतक:यांना उसतोडीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 12:07 PM