लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणा:यांवर कठोर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिल़े जिल्हाधिकारी कार्यालयात कोटपा कायदा अंमलबजावणीबाबत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.बैठकीस पोलीस उपअधीक्षक सिताराम गायकवाड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक के.डी.सातपुते, सामाजिक कार्यकर्ते हैदरअली नुरानी आदी उपस्थित होते. यावेळी बोलता डॉ़ भारुड यांनी सांगितले की, शाळा, महाविद्यालयांना विशेष पथकांनी भेट देऊन तंबाखू सेवनाबाबत कारवाई करावी. शाळेच्या 300 फूट परिसरात तंबाखू विक्री होत असल्यास पोलीस नगरपालिका, अन्नव औषध प्रशानाचे सहकार्य घेण्यात याव़े तंबाखू बंदीबाबत जनजागृतीसाठी 14 नोव्हेंबर रोजी समाजमाध्यमांद्वारे एकाचवेळी जिल्ह्यातील दोन ते तीन लाख नागरिकांशी संवाद साधण्यात येईल़
तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणा:यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:16 PM