सारंगखेडा यात्रा : 400 पेक्षा अधिक उमदे घोडे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 10:50 AM
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्त यात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली असून, या वेळी चेतक फेस्टिवल समितीचे पदाधिकारी आपापल्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान घोडे बाजारात आत्तापासूनच घोडे विक्रीसाठी दाखल झाले असून, 400 पेक्षा अधिक घोडय़ांची आवक झाली आहे. यावर्षी ही यात्रा ...
लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्त यात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली असून, या वेळी चेतक फेस्टिवल समितीचे पदाधिकारी आपापल्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान घोडे बाजारात आत्तापासूनच घोडे विक्रीसाठी दाखल झाले असून, 400 पेक्षा अधिक घोडय़ांची आवक झाली आहे.यावर्षी ही यात्रा नावीन्यपूर्ण होणार असून, यावर्षी 3 डिसेंबरपासून ते 3 जानेवारी या एक महिन्याच्या कालावधीत चेतक फेस्टीवल समिती व पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाची मेजवानी पर्यटक आणि यात्रेकरूंना मिळणार आहे. यात्रेतील घोडय़ांसाठी अत्याधुनिक मंडपाची व्यवस्था करण्यात येत असून, ही व्यवस्था राजस्थान येथील पुष्कर मेळाच्या धर्तीवर करण्यात येत असून, ही यात्रा देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचली असून, या यात्रेत विदेशी पर्यटकांची हजेरी मागील वर्षी प्रमाणे लागेल. या पाश्र्वभूमीवर विदेशी तसेच देशाच्या विविध कानाकोप:यातून येणा:या भाविकांसाठी अत्याधुनिक राहुटय़ांची व्यवस्था करण्यात येत आहे. या राहुटय़ांमध्ये पंचतारांकीत हॉटेल्स प्रमाणे राहण्याची उत्तम व्यवस्था असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पर्यटकांसाठी या राहुटय़ा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.