भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये एक तर सप्टेंबर महिन्यात 64 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आह़े याअंतर्गत जिल्ह्यात प्रथमच लोकांमधून सरपंच निवड होणार असून म्हसावद ग्रामपंचायतीला पहिल्या लोकनियुक्त सरपंचाचा ऐतिहासिक सन्मान प्राप्त होणार आह़े शासनाने लोकनियुक्त सरपंच निवडीचे आदेश काढल्यानंतर जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर्पयत 65 ग्रामपंचायतींसाठी निवडणूका होणार आहेत़ लोकांमधून सरपंच निवड करण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर जिल्ह्यात होणा:या सर्व 65 ग्रामपंचायत निवडणूका ऐतिहासिक ठरणार आहेत़ ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या काळात मुदत संपणा:या नंदुरबार जिल्ह्यातील 65 ग्रामपंचायती आहेत़ यात गेल्या 24 ऑगस्टपासून म्हसावद ता़ शहादा येथील ग्रामपंचायतीसाठी अधिसूचना लागू करण्यात आली आह़े यात 4 सप्टेंबरपासून नामनिर्देशन मागवणे, 11 सप्टेंबर छाननी, 13 सप्टेंबर अर्ज माघार व निवडणूक चिन्ह वाटप, 23 सप्टेंबर रोजी मतदान असा हा कार्यक्रम राहणार आह़े 952 गावे आणि 586 ग्रामपंचायती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात म्हसावद ग्रामपंचायतीत पहिल्या लोकनियुक्त सरंपच निवडीच्या या प्रक्रियेकडे सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय तज्ञांचे लक्ष लागून आह़े म्हसावद ता़ शहादा येथील निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात पुन्हा 64 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत़ याही ठिकाणी लोकांमधून सरपंच निवड होणार असल्याने या गावांमध्ये उत्सकुता निर्माण झाली आह़े जिल्ह्यात गेल्या काही वर्षात बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात होणा:या थेट सरपंच निवडणूका लक्ष्यवेधी ठरणार आहेत़ नवापूर, नंदुरबार, शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात होणा:या या निवडणूकांसाठी प्रशासन सज्ज आह़े
म्हसावदला निवडून येणार लोकांमधून सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:51 PM
सप्टेंबर महिन्यात मतदान : अक्कलकुवा तालुक्यात 10 नवीन ग्रामपंचायतींसाठी प्रथमच प्रक्रिया
ठळक मुद्देम्हसावदला 27 सप्टेंबर रोजी निकाल राज्यातील 114 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आह़े यात म्हसावद ता़ शहादा या ग्रामपंचायतीचा समावेश आह़े या ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 25 सप्टेंबर रोजी मतमोजणी होऊन 27 सप्टेंबर रोजी निकाल घोषित अक्कलकुवा तालुक्यात 10 ग्रामपंचायती नवीन नंदुरबार जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये होणा:या 64 ग्रामपंचायत निवडणूकांद्वारे लोकनियुक्त सरपंच नियुक्त होणार आह़े यात अक्कलकुवा तालुक्यातील खडकुना, टावली, मंडारा, खाई, कौलवीमाळ, कंकाळामाळ, कुवा, बेडाकुंड बोखाडी आणि वड