नंदुरबार : तालुक्यातील अक्राळे येथे ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंच पदासाठी अर्ज दाखल करणाºया उमेदवारास पळवून नेल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती़ संबधित उमेदवाराच्या पत्नीने सोमवारी सायंकाळी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला़अक्राळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सिताराम भिल हे अर्ज करणार असल्याची माहिती होती़ यातून ५ सप्टेंबर रोजी रोहिदास शंकर राठोड, दिलीप शंकर राठोड यांच्यासह अन्य तिघे सिताराम भिल यांच्याघरी गेले़ तेथे त्यांनी निवडणूकीत अर्ज दाखल करु नको सोबत चल असे सांगून घेऊन गेले होते़ या घटनेनंतर सिताराम भिभल यांच्या पत्नी आशाबाई यांनी वेळावेळी राठोड यांच्यासोबत संपर्क करून पतीला पाठवले नाही़ सोमवारी सायंकाळी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात आशाबाई सिताराम भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रोहिदास राठोड, दिलीप राठोड यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक पाकळे करत आहेत़ याप्रकाराने अक्राळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून उमेदवारीस इच्छुक सिताराम भिल नेमके कुठे गेले असतावेत यावर चर्चा रंगत आहेत़
सरपंच पदासाठी अर्ज भरणाऱ्यास पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 7:01 PM
ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद
ठळक मुद्दे आक्राळे येथील प्रकाराने खळबळ तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद