तळोदा मार्गाने गुजरात राज्यातील सागबारा, डेडियापाडा, अंकलेश्वर, भरुच, बडोदा, पावागड, सुरत, अहमदाबाद आदी शहरांसाठी खान्देशसह राज्यातील इतर आगारातील बसेस चालविण्यात येत होत्या. सोबतच गुजरात राज्यातील इतर आगारांच्या बसेसही तळोदा मार्गाने सुरू होत्या. तळोदा बसस्थानकातून एकाचवेळी दोन ते तीन बसेस गुजरातमध्ये जाण्यासाठी मिळत असल्याने प्रवाशांची गर्दीही होत होती. दरम्यान, कोरोनामुळे या बसेस बंद केल्याने बसस्थानकातील गर्दी कमी झाली होती. परंतु आता पुन्हा बसेस सुरू केल्या असल्याने प्रवाशांची वर्दळ वाढली आहे.
तळोदा मार्गाने सद्यस्थितीत चोपडा-पावागड, चोपडा-बडोदा, शिरपूर-बडोदा, जळगाव-अंकलेश्वर, चोपडा-जंबूसर, शहादा-अंकलेश्वर, अमळनेर-भरुच, दोंडाईचा-अंकलेश्वर, शहादा-बडोदा यांसह इतर बसेस पुन्हा धावत आहेत.
एकीकडे गुजरात राज्यातील बससेवा सुरू झाली असली तरीही, अक्कलकुवा आगारातून अक्कलकुवा-मुंबई, तळोदा-सुरत, तळोदा-वापी या बसेस अद्याप सुरू केलेल्या नाहीत. तालुक्यातून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसफेऱ्याही बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.