ऑनलाईन लोकमत
शनिमांडळ,दि.25-नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शनि अमावस्यानिमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावून गर्दी केली होती़ यात प्रमुख्याने गुजरात राज्यातील भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती़
दरवर्षी शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठय़ा संख्येने गर्दी होत असत़े त्यामुळे काही भाविकांनी दर्शन व्यवस्थीतपणे घेता यावे यासाठी पहाटे चार वाजताच दर्शनासाठी हजेरी लावली़ सकाळी 8 वाजेर्पयत अमावस्येचा काळ असल्याने पहाटे पहाटे भाविकांनी उपस्थिती लावली होती़
दरम्यान, सकाळी 6 वाजेपासून तर अगदी लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ त्यात सर्व वयोगटातील भाविकांची हजेरी होती़ भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून स्वयंसेवकांचीही व्यवस्था करण्यात आली होती़ त्यांच्याकडून भाविकांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत होत़े परिसरातील ग्रामस्थांकडून आलेल्या भाविकांना पाण्याची व्यवस्था करुन देण्यात येत होती़ भक्तीमय वातावरणात वेळावेळी वरुन राजादेखील हजेरी लावली.