लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : योजनेअंतर्गत जिल्ह्यात १६^ हजार शेतकऱ्यांकडील चार लाख २४ हजार ९०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या कापसाची किंमत २२९ कोटी तीन लाख ४३ हजार एवढी आहे.कोरोना संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कापूस खरेदीला वेग देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते. पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी देखील याबाबत निर्देश दिले होते. लॉकडाऊनपूर्वी केवळ दोन लाख ९७ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. लॉकडाऊननंतर तांत्रिक अडचणींमुळे व आवश्यक कुशल मजूर उपलब्ध होत नसल्याने खरेदी प्रक्रीया काही काळ थांबली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी तांत्रिक अडचणी दूर करून खरेदी प्रक्रीया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी कापूस खरेदी केंद्रालाही भेटी दिल्या. लॉकडाऊन कालावधीत खरेदी प्रक्रया सुरू झाल्यानंतर सुमारे साडे चार हजार शेतकºयांकडील एक लाख २६ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. त्याची एकूण किंमत ६७ कोटी ५४ लाख रुपये आहे.सीसीआयच्या माध्यमातून सर्व शेतकºयांकडील कापूस खरेदी करण्यात आली असून नंदुरबार तालुक्यातील सात हजार ४४ शेतकºयांकडील एक लाख ७० हजार १८९ क्विंटल, नवापूर तालुक्यात ७०१ शेतकºयांकडील २४ हजार ४४२ क्विंटल आणि शहादा तालुक्यातील आठ हजार २६० शेतकºयांकडील दोन लाख ३० हजार क्विंटल असे एकूण १६ हजार पाच शेतकºयांकडील चार लाख २४ हजार ९०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक यांनी दिली आहे.लॉकडाऊनच्या काळात कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. परंतु नंतर ती सुरू करण्यात आली. शेतकºयांकडील कापसाचे पंचनामे करून त्यांची नोंदणी करून सर्व कापूस खरेदी करण्यात आला. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला. दरवाढ होईल या आशेने शेतकºयांनी कापूस घरातच ठेवला होता. त्यातच लॉकडाऊन सुरू झाले होते.
सव्वाचार लाख क्विंटल कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:29 PM