n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांचे कोरोना अहवाल येत असून त्यात अनेक शिक्षक पॅाझिटिव्ह निघत आहेत. त्यामुळे शाळांसह विद्यार्थी पालकांचीही चिंता वाढली आहे. नंदुरबारातील एका नामांकित शाळेतील एका शिक्षकाने सहा दिवसांपूर्वी दिलेल्या स्वॅबचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. अहवाल येईपर्यंत संबधीत शिक्षक नियमित अध्यापनाचे कामकाज करीत होते. त्यामुळे आता शाळेला ६ डिसेंबरपर्यंत सुट्ट्या द्याव्या लागल्या आहेत. आता १ डिसेंबरपासून आश्रमशाळा सुरू होणार असल्याने आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वॅब संकलन सुरू करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शाळा २३ डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्याच्या आधीपासूनच संबधीत वर्गांना शिकविणारऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु स्वॅब संकलनाच्या ठिकाणी होणारी गर्दी, स्वॅब तपासणीची संथ गती यामुळे मोठ्या प्रमाणावर अहवाल प्रलंबीत होते. दुसरीकडे शाळा सुरू झाल्या. आवश्यक शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहून अध्यापन देखील करू लागले. परंतु नंतर संबधीत शिक्षकांचे कोरोना अहवाल येऊ लागले असून अनेकजण त्यात पॅाझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे शाळांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नऊ दिवस द्यावी लागली सुट्टीनंदुरबारातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॅाझिटिव्ह आला. शाळा सुरू होण्याच्या आधीपासून स्वॅब दिल्यानंतर तब्बल पाच ते सात दिवसांनी अहवाल आला. तोपर्यंत संबधित शिक्षकाने अध्यापनाचे कामकाज सुरू केले होते. त्यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. सुदैवाने या शाळेत कोरोनाबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सर्वांना मास्क सक्तीचे, सॅनिटायर आणि निर्जंतूकीकरण याचा वेळोवेळी वापर केला जात आहे. त्यामुळे फारसी रिस्क नसली तरी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने मात्र खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून शाळेने नऊ दिवस अर्थात ६ डिसेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. अहवाल येण्यास उशीरअद्यापही अनेक शाळांमधील शिक्षकांचे कोरोना अहवाल येण्याचे प्रलंबीत असल्याचे बोलले जात आहे. नववी ते १२ वीला शिकविणाऱ्या ४,१४१ शिक्षकांपैकी किमान २०० ते ३०० शिक्षकांचे अहवाल येण्याची प्रलंबीत असल्याचे सांगण्यात आले. अनेकांनी २० ते २१ तारखेला स्वॅब दिलेले असतांना देखील त्यांचे अहवाल शनिवारपर्यंत आलेले नसल्याचे चित्र होते. या शिक्षकांना मात्र शाळांनी शाळेत नियमित उपस्थितीचे फर्मान सोडलेले होते. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ नकोजिल्ह्यातील अनेक शाळांनी पूर्वीप्रमाणे ऑनलाईन क्लास बंद केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सक्तीचे झाले आहे. बरेच विद्यार्थी ग्रामिण भागातून शाळेत येतात. सद्या अनेक गावांना एस.टी.बसेस नाहीत, काही गावांना सार्वजनीक वाहतूक सुविधा नाहीत. त्यामुळे अशा गावातील विद्यार्थ्यांना मोठी कसरत करीत शाळेत यावे लागते. अशा वेळी कोरोनाचे सर्व नियम त्यांना पायदळी तुडवून मिळेल त्या वाहनाद्वारे शाळेत पोहचावे लागत आहे. त्यामुळे सद्या विद्यार्थ्यांच्या जीवाशीच खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.
आश्रमाशाळा शिक्षक राज्य शासनाने आश्रम शाळा देखील १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आश्रम शाळा शिक्षकांना देखील आता कोरोना चाचणी करावी लागत आहे. १ डिसेंबरच्या आधी सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी झाली पाहिजे असे आदेश असल्याने स्वॅब संकलन केंद्रावर अशा शिक्षकांची गर्दी होत आहे.
खेड्यापाड्यातील विद्यार्थीआश्रमशाळेत शिकणारे विद्यार्थी हे खेड्यापाड्यातील असतात. त्यांना आणून शाळेत दाखल करणे व त्यांच्यावर लक्ष ठेवणे म्हणजे मोठी कसरत राहणार आहे. आश्रमशाळा व्यवस्थापन, शिक्षक यांच्यासाठी ही बाब मोठी दिव्याची ठरणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी देखील शिक्षकांची फिरफिर होणार आहे.