लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बडबड गीते आणि कवितांचा सूरात आनंदाने नाचणारी मुले मंगळवारी मात्र लसीकरणाच्या भितीने आपल्या पालकांसोबत अश्रू गाळत होत़े निमित्त होते, गोवर-रुबेला लसीकरणाच़े़़़ येथील आदर्श विद्यामंदिरात आज मुलांचीही अनोखी शाळा पहायला मिळाली़ शासनाने यावर्षी प्रथमच 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना गोवर-रुबेला लसीकरण करण्याची मोहिम सुरु केली आह़े ऐरवी आरोग्य विभागातर्फे गोवरचे लसीकरण करण्यात येत होत़े परंतू हे लसीकरण एकाचवेळी होत नव्हत़े परिणामी गोवरची रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे आव्हानच ठरले होत़े या पाश्र्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून त्यावर संशोधन सुरु होत़े वैद्यकीय तज्ञांच्या मते, ही लसीकरण मोहिम एकाचवेळी पल्स पोलिओ सारखी राबवल्यास त्याचे इंफेक्शन थांबेल व आजारावरही नियंत्रण मिळवता येईल़ जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याबाबत सल्ला दिल्याने शासनातर्फे ही मोहिम सुरु करण्यात आली़ त्याला रुबेलाची जोडही देण्यात आली़ महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मंगळवारपासून त्याचा शुभारंभ झाला़ या लसीकरणाचे सूक्ष्मनियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात शाळांमध्ये हे लसीकरण होत आह़े नंदुरबार शहरात पहिल्याच दिवशी येथील आदर्श विद्यामंदिरात ही मोहिम राबवण्यात आली़ त्यामुळे येथील शाळेचे चित्र आज वेगळेच पहायला मिळाल़े याबाबत जनजागृती यापूर्वीच झाल्याने प्रत्येक विद्यार्थी आपल्या पालकासोबत आला होता़ शाळेत चार केंद्र लावण्यात आले होत़े त्या केंद्रांवर आपल्या मुलासह पालकांची लांबच लांब रांग होती़ हे लसीकरण विशेषत: इंजेक्शन रुपात देण्यात येत असल्याने सहाजिकच विद्याथ्र्यामध्ये त्याची भिती होती़ त्यामुळे बहुतांश मुले भितीने मोठय़ाने रडत होती़ पालक त्यांना समजूत घालत होत़े लसीकरणाच्या ठिकाणी काहींना मोठी कसरत करावी लागत होती़ त्यामुळे तब्बल चार तास या शाळेत रडण्याचे सूर ऐकू येत होत़े एकएक पालक आपल्या मुलाला मतदान केंद्रात कसे मतदानाला जातात त्या पद्धतीने जात होत़े त्यांची शिक्षक नोंद घेत होत़े त्या यादीवर नोंद झाल्यानंतर मुलाच्या बोटावर शाई लावून नंतर त्याला लस दिली जात होती़ त्यानंतर प्रमाणपत्रही दिले जात होत़े प्रमाणपत्र स्विकारल्यानंतर मुलांच्या चेह:यावर मात्र काहीसा आनंद तरंगताना दिसत होता़ या सर्व प्रक्रियेत शिक्षकांना मात्र प्रचंड कसरत करावी लागली़ या शाळेत एकूण 1 हजार 13 विद्याथ्र्याना लसीकरण करण्यात आल़े तब्बल सात तास ही मोहिम सुरु होती़ मोहिम राबवण्यासाठी मुख्याध्यापिका नंदाबेन शहा व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांनी परिश्रम घेतल़े
बालगीतांऐवजी शाळेत ‘गुंजले रडगाण्याचे सूर !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 1:44 PM