शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

दुसऱ्या फेरीतही नंदुरबार जिल्हा मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 7:32 PM

आरटीई : जिल्ह्यातून केवळ ४२१ आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल

नंदुरबार : २५ टक्के मोफत प्रवेश (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातून ४७० जागांसाठी केवळ ४२१ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत़ पहिल्या फेरीपर्यंत आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात राज्यात ‘सेकंड लास्ट’ असलेला नंदुरबार जिल्हा दुसऱ्या फेरीत शेवटी फेकला गेला असल्याचे दिसून येत आहे़ ३० मार्चपर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेश करण्याची मुदत पालकांना देण्यात आलेली आहे़जिल्ह्यात एकूण ४७ शाळांच्या माध्यमातून ४७० जागांसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे़ यांतर्गत आतापर्यंत जिल्हाभरातून केवळ ४२१ अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ पैकी, ४२० अर्ज आॅनलाईन पध्दतीने तर एक अर्ज मोबाईल अ‍ॅप्लीकेशनव्दारे सादर करण्यात आलेला आहे़ पहिल्या प्रवेश फेरीपर्यंत राज्यात सर्वाधिक पिछाडीवर असलेल्या सिंधुदूर्ग जिल्ह्याने नंदुरबारला मागे टाकले आहे़ सिंधुदूर्ग जिल्ह्यातून ३५३ आरटीई जागांसाठी एकूण ५१० आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़खान्देशात जळगाव आघाडीवरजळगाव, धुळे व नंदुरबारचा विचार करता आरटीई प्रवेश प्रक्रियेत आॅनलाईन अर्ज सादर करण्यामध्ये जळगाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे़ जळगावात एकूण २७४ शाळांमार्फत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ एकूण ३ हजार ७१७ जागांपैकी ६ हजार २२८ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ तर १७ अर्ज मोबाईल अप्लीकेशनव्दारे सादर करण्यात आलेले आहेत़ अशा प्रकारे एकूण ६ हजार २४५ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ धुळ्यात ९७ शाळांमार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी १ हजार २३७ जागांसाठी २ हजार ९१ आॅनलाईन अर्ज व ५ अर्ज मोबाईल अ‍ॅप्लीकेशनव्दारे असे एकूण २ हजार ९६ अर्ज दाखल झालेले आहे़इतर आदिवासी जिल्हे नंदुरबारच्या पुढेचआरटीई प्रवेश प्रक्रियेत नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत इतर अनेक आदिवासी तसेच मागास जिल्हे पुढे असल्याचे दिसून येत आहे़ गडचिरोलीत ८२ शाळांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ तेथे एकूण ७८४ जागांसाठी १ हजार २७ इतके आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़ पालघर जिल्ह्यात एकूण २२२ शाळांच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़एकूण जागार ४ हजार २५२ असून त्यासाठी १ हजार १६८ अर्ज दाखल झालेले आहेत़ यवतमाळ जिल्ह्यात १९६ शाळांच्या माध्यमातून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून एकूण जागा १ हजार ७४४ आहेत़ यासाठी तब्बल ४ हजार ४८७ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत़अर्जांची छाननी प्रक्रिया...अद्याप पालकांकडून आॅनलाईन पध्दतीने आरटीई प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्यात येत आहे़ यासाठी मुदत वाढवून ती ३० मार्च करण्यात आलेली आहे़ या तारखेपर्यंत आलेल्या एकूण अर्जांची व सोबतच्या कागदपत्रांची विभागाकडून छाननी करण्यात येणार आहे़ यातून अनेक प्रस्ताव त्रुटींमुळे रिजेक्ट होण्याचीदेखील शक्यता असते़ त्यामुळे आधीच कमी आलेले प्रस्ताव व त्यात त्रुटींमुळे रिजेक्ट होणारे प्रस्ताव यामुळे परिणामी यंदाही आरटीईच्या जागा रिक्त राहणार की काय? असा प्रश्न निर्माण होत आहे़मागील वर्षी आरटीईअंतर्गत जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाला चार प्रवेश फेºया घेण्याची वेळ आली होती़ तरीदेखील मागील वर्षी एकूण १३७ आरटीईच्या जागा शिल्लक होत्या़ तेच आताही होतय की काय अशी भिती शिक्षण विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार वेळापत्रकात बदल, तारखांचा घोळ आदी सावळा गोंधळ झाला होता़ तसेच आरटीई प्रवेशासाठी अनेकांकडून लॉबिंगदेखील सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे़