लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील विसरवाडी ते कोंडाईबारी घाटादरम्यान रविवारी सायंकाळी झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ उर्वरित दोघांचीही प्रकृती गंभीर असून महामार्गावरचे खड्डे अपघातांना कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े रविवारी सायंकाळी उचीशेवडी ता़ नवापुर गावाकडे परत जाणा:या एमएच 41 सी 8716 या मजूरांच्या रिक्षेला ट्रकने धडक दिल्याने 15 जण जखमी झाले होत़े यातील जखमी लिलाबाई आसू गावीत (42) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ याप्रकरणी नितेश राजेश गावीत यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन टीएन एच 3364 वरील चालकाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अपघातात ट्रकने रिक्षासह एमएच 18-एल-8216 ही मोटारसायकल व एमएच 18 डब्ल्यू 8515 या चारचाकी वाहनालाही धडक दिली होती़ दुचाकीस्वार अरुण तोरवणे रा़ चिंचपाडा हे गंभीर जखमी झाले होत़े रिक्षातील जखमींसह त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत़
कोंडाईबारी घाट ते विसरवाडी दरम्यान रस्ता पूर्णपणे खराब झाला आह़े साधारण 5 ते 15 फुट लांबीचे खड्डे पडल्याचे येथे दिसून येत आह़े त्यात पाणी आणि चिखल असल्याने दुचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आह़े यात अवजड वाहनचालक भरधाव वेगात वाहने दामटत असल्याने खड्डय़ांमुळे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत़ गेल्या चार महिन्यात पावसामुळे रस्त्याची स्थिती अधिक दयनीय झाली आह़े रविवारी सायंकाळी वाहन चालकाने वेगात वाहन चालवल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत होत़े ट्रकचालक नागराजन अरुगामे रा़ तामिळनाडू याला अटक करण्यात येऊन विसरवाडी पोलीसांनी सोमवारी नवापुर न्यायालयात हजर केले होत़े न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आह़े