शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

तळोद्यात साडेसात किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:02 PM

पालिकेची कारवाई : 30 दुकानांची केली तपासणी, मुख्याधिका:यांचा पुढाकार

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : तळोदा पालिकेकडून सोमवारी शहरातील मेनरोड परिसरातील 30 दुकानांची तपासणी करुन त्यांच्याकडून सुमारे साडेसात किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या़ त्यानंतर त्या नष्ट करण्यासंदर्भात  कार्यवाही करण्यात आली़ पालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली़ राज्यभरात गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक पिशव्या तसेच ठराविक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आह़े त्यानूसार सोमवारी पालिकेकडून प्लॅस्टिक पिशव्या तसेच बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक वस्तूंची जप्ती मोहिम हाती घेण्यात आली़ पालिका आस्थापना प्रमुख राजेंद्र सैंदाणे यांच्यासह सुरेंद्र वळवी, सुरेश रामराजे, राजू  यांच्या पथकाने ही कारवाई केली़  यापूर्वी शहरातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांना 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करुन नये केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता़ तसेच असलेला साठा त्वरीत संपवावा व पुन्हा मालाची आयात करु नये असेही सांगण्यात आले होत़े तसेच सूचना करुनही ज्या व्यापारी तसेच दुकानदारांकडे बंदी घालण्यात आलेला प्लॅस्टिकचा माल आढळून येईल अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होत़े त्यानुसार सोमवारी पालिकेकडून कारवाई करण्यात आली़ दरम्यान या मोहिमेसाठी मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी पुढाकार घेतल्याने पर्यावरणप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़ेया परिसरातील बहुतेक व्यापारी गुजरात तसेच जळगावातून प्लॅस्टिकच्या मालाची आयात करीत असतात़ राज्या शासनाकडून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर अनेक व्यापा:यांनी मालाची आयात थांबवली होती़ परंतु काहींकडून बंदीनंतरसुध्दा प्लॅस्टिकच्या पिशव्यांची आयात करण्यातच येत होती़ त्यामुळे पालिका प्रशासनाकडून अशा व्यापा:यांच्या दुकानाची तपासणी करण्यात आली़ तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आह़े