n लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा, गुजरात मधील कुकुरमुंडा येथून वाडी पुनर्वसन येथे सात लाखाचा गुटखा नेत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे आमलाड नाजिक पकडून हस्तगत केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता गुजरात मधील कुकुरमुंडा येथून पीकअप वाहनात अवैध रित्या विमल गुटखा शाहादा तालुक्यातील शोभा नगर पुनर्वसन येथे जाणार असल्याची समजले. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने या वाहनावर पाळत ठेऊन आमलाड फट्यानाजिक अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये सात लाखाचा विमल गुटखा आढळून आला. पथकाने वाहनासह मुद्देमाल असा एकुण १२ लाखाचे ऐवज जप्त केला. ही कार्यवाही एल.सी.बी चे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांचा मार्गदर्शनाखाली हवालदार मुकेश तावडे, जितेंद्र तांबोळी, राजेंद्र कटके यांनी केली आहे. आरोपी चालक विरसिंग ओरमा वसावे व शंकर ठोग्या वसावे दोन्ही रा.शोभा नगर ता. शहादा यांचा विरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश केदार करीत आहे. दरम्यान गेल्या चार वर्षांनी प्रथमच अवैध विमल गुटखा प्रकरणी कारवाही केल्याने तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
तळोद्यात सात लाखांचा अवैध गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:39 PM