लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : तालुक्यातील असली येथे 10 वर्षाच्या खंडानंतर खरीप हंगामात शेतक:यांना मार्गदर्शन करणारी पारंपरिक बारमेघ जत्रा भरवण्यात आली होती़ या खरीप जत्रेत पारंपरिक बी-बियाण्यांसह, वनभाज्या, शेती साहित्य यांची खरेदी विक्री करण्यात आली़ या वेळी पारंपरिक शेती टिकवून ठेवण्यासाठी चर्चाही करण्यात आली़ सातपुडय़ाच्या दुर्गम व अति दुर्गम भागात पारंपरिक शेतीमूल्य जपणारे आदिवासी बांधव वर्षानुवर्षे चालत असलेल्या पद्धतीनुसार शेती करून उत्पन्न मिळवण्यास कायम प्राधान्य देत आहेत़ परंपरेने चालत आलेल्या शेतीचा :हास होऊ नये यासाठी धडगाव तालुक्याच्या अति दुर्गम भागात गेल्या अनेक वर्षापासून खरीप हंगामाला साहाय्यकारी ठरणारी ‘बारमेग जातरें’ अर्थात बारमाही यात्रा भरवण्यात येत़े गेल्या काही वर्षात या यात्रेच्या आयोजनात खंड पडला होता़ परंतु यंदाच्या वर्षात पुन्हा नव्याने ही यात्रा घेण्यात आली़ मागच्या पिढीकडून येणा:या पिढीला पारंपरिक शेती पद्धत समजावून सांगण्यासाठी 28 व 29 मे या दोन दिवसात झालेल्या यात्रोत्सवात नामशेष होत असलेल्या पारंपरिक बी-बियाण्याची साठवण, पेरणी आणि संवर्धनाबाबत चर्चा करण्यात आली़ तसेच जल जंगल आणि जमीन याबाबत चर्चासत्र घेण्यात आल़े बारमेगचे पूजन करून धनुष्यबाणाने मडके फोडण्याचा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला़ यात विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला़ दोन दिवस रात्री सोंगाडय़ा पार्टीचे कार्यक्रम झाल़े यात्रोत्सवात आमदार क़ेसी़ पाडवी, माजी सभापती सी़क़े पाडवी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कागडा पाडवी यांच्यासह विविध मान्यवरांनी हजेरी लावत शेतक:यांसोबत संवाद साधला़ पारंपरिक शैलीत झालेल्या यात्रोत्सवात वर्षानुवर्षे पेरत असलेल्या बियाण्यांची प्रतवारी, नैसर्गिकदृष्टय़ा त्यांचे महत्त्व यासह वनभाज्यांच्या बियाण्यांची विक्री करण्यात आली होती़ यासोबतच विविध प्रकारच्या पारंपरिक साहित्य बनवून घेत त्याची खरेदी आदिवासी शेतक:यांनी केली़ दोन दिवसात याठिकाणी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील शेकडो शेतक:यांनी सहभाग नोंदवला होता़ परिसर यात्रा समिती, सरपंच व ग्रामस्थ असली यांच्याकडून या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होत़े
सातपुडय़ात भरली ‘बारमेग’ जत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 12:33 PM