ऑनलाईन लोकमत1 सप्टेंबरतळोदा : तालुक्यातील सात हजार कुटुंबांकडे शौचालये नसल्याची माहिती येथे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत देण्यात आली. याशिवाय एकूण ग्रामपंचायतींपैकी अजून 27 ग्रामपंचायती शौचालयाविना असून, या ग्रामपंचायती ऑक्टोबर्पयत हगणदरीमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालयात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमाने शौचालयांविषयी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार होत्या. या वेळी शौचालयाबाबत औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मी गेल्या 35 वर्षापासून आजतागायत गावाचा सरपंच आहे. अन् माझ गावं पापुडा सन 2005 सालापासून हगणदरीमुक्त झाले आहे.सुदृढ आरोग्यासाठी शौचालय अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे गावात सार्वजनिक शौचालये बांधले पाहिजे. आता शासनाचे समाधानकारक अनुदान आहे. शौचालयामुळे गावाच्या विकासात देखील भर पडत असते. माङया गावास विविध बक्षिसातून आतापावेतो दोन कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या शिवाय ग्रामपंचायतीचा कर भरणा:यास ग्रामपंचायतीकडून वेगवेगळ्या सवलती देखील दिल्या जात असतात. तळोदा तालुक्यातील शौचालयांची आकडेवारी देताना त्यांनी सांगितले की, 2012 नुसार तालुक्यात 25 हजार दारिद्रय़रेषेखालील कुटुंबे आहेत. 51 पैकी 24 ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. अजूनही 27 ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्याच्या बाकी आहेत. तसेच 18 हजार कुटुंबांकडे वैयक्तीक शौचालये आहेत. अद्याप सात हजार कुटुंबाकडे शौचालये नाहीत. अर्थात बहुसंख्य ग्रामपंचायतींमार्फत शौचालयाची कामे सुरू असली तरी येत्या दोन ऑक्टोबर्पयत संपूर्ण तालुका हगणदरीमुक्त करण्याचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे शौचालयांसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांनी ठोस प्रय} करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी केले. या कार्यशाळेस उपसभापती दीपक मोरे, जिल्हा परिषद सदस्य नरहर ठाकरे, पंचायत समिती सदस्य सिताराम राहसे, अजरुन वळवी, हुपा वसावे, सहायक गटविकास अधिकारी एस.एस. सोनवणे, विस्तार अधिकारी संजय पाटील, सरपंच जयसिंग माळी, दिवाकर पवार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सात हजार कुटुंब शौचालयाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 11:23 AM