सारंगखेडा : गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना अवैधपणे वाळूची वाहतूक करणा:या सात वाहनांवर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. यापैकी सहा वाहने सारंगखेडा पोलीस स्टेशन आवारात तर एक शहादा तहसील आवारात जमा करण्यात आले. या कारवाईमुळे अवैधपणे वाळूचा उपसा व वाहतूक करणा:यांचे धाबे दणाणले आहे.सध्या सावळदे येथून मोठय़ा प्रमाणात वाळूचा उपसा सुरू आहे. ही वाळू नाशिक व मुंबई येथे पाठविण्यात येते. अवैधपणे वाळूचा उपसा व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पथके नेमली आहेत. शुक्रवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेदरम्यान शहादा ते अनरदबारी दरम्यान वाळूने भरलेली सात ट्रक व डंपर (क्रमांक एम.एच.16 एवाय- 5193, एम.एच.15 ईई- 1555, एम.एच.15 ईई-4455, एम.एच.15 केव्ही- 6477, एम.एच.15 एफव्ही- 7875, एम.एच.18 बीए- 0047) जात होती. यातील एक वाहन शहादा तहसील हद्दीत जमा करण्यात आले. ही वाहने महसूल विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आली. त्यांनी वाहने थांबवून चालकांकडे असलेल्या पावत्यांमधील इन्व्हाईस नंबर तपासले असता ते चुकीचे आढळून आले. त्यामुळे ही वाहने जप्त करून त्यापैकी सहा वाहने सारंगखेडा पोलीस स्टेशनच्या आवारात तर एक वाहन शहादा तहसील आवारात जमा करण्यात आले. ही कारवाई सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा (तळोदा), सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी. (नंदुरबार), तळोद्याचे तहसीलदार योगेश चंद्रे, शहाद्याचे नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, लिपीक किशोर बादुर्गे, आनंद महाजन, तलाठी रवींद्र गवळी आदींनी केली.
जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमणूक जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा व वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री सारंगखेडा ते शहादा दरम्यान सात वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडे रॉयल्टीच्या पावत्या मुदत संपलेल्या आढळून आल्या. शहाद्याचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे या वाहनांवर दंडात्मक कारवाई करतील.-योगेश चंद्रे, तहसीलदार, तळोदा.