लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यामुळे शेतकरी व साखर कारखानदार अडचणीत आले आहेत. हुमणी किडीच्या नायनाटासाठी सातपुडा साखर कारखान्याच्या कृषी विभागाने कंबर कसली असून, लाईट ट्रॅप तसेच प्रकाश सापळ्यांचा प्रभावी वापर करण्यास शेतक:यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.या किडीच्या नायनाटासाठी जणू काही स्पर्धाच सुरू झाली असून, विविध प्रयोगाने, औषधोपचाराने या किडीचा नायनाट व्हावा म्हणून शर्तीचे प्रय} सुरू आहेत. सातपुडा कारखान्यानेदेखील लाईट ट्रॅप तसेच प्रकाश सापळ्यांचा प्रभावी वाटप करून या हुमणीचे भुंगे:यांना पकडण्याच्या कामाचे मार्गदर्शन कारखान्याचे मुख्य शेतकरी अधिकारी अजितकुमार सावंत व गट सुपरवायझर यांच्या माध्यमातून सुरू आहे.हुमणीचा भुंगेरा आणि अळी अशा दोन प्रकारच्या अवस्था असतात. तसेच अळी अवस्थेत नियंत्रण करण्याकरीता पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कृषी महाविद्यालय येथे मेटॅरायङिाअम 200 रू. प्रतिलिटर प्रमाणे मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. प्रती एकरी 200 लिटर पाण्यात दोन लिटर मेटॅरायङिाअम मिसळवून मुळांच्या कक्षेत आळवणी करून हुमणीचा बंदोबस्त करता येतो. त्याबाबत सभासदांनी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांचेशी संपर्क साधावा. तसेच गटनिहाय लागण हंगाम 2018-19 च्या ऊस नोंदीच्या याद्या गाववार प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. याबाबत नोंद केलेल्या उसाची जात, क्षेत्रफळ व नोंदीची तारीख पडताळणी करून काही हरकत असल्यास गट कार्यालयात लेखी स्वरूपात आपली हरकत नोंदवाणी, असे आवाहनही कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी केले आहे.
हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातपुडय़ाची मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:55 PM