शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

नंदुरबारात तीन तालुक्यात ‘गंभीर’ दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:29 AM

सरासरी दीडमीटरने पाणीपातळी खालावली : नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक साडेतीन मीटर खोल

नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी 58 गावांमध्ये प्रशासनाकडून सत्यता पडताळणी करण्यात आली होती़ या सव्रेक्षणाचा अहवाल राज्यशासनाकडे पाठवण्यात आला असून याद्वारे तीन तालुक्यात गंभीर दुष्काळ असल्याचे कळवण्यात आले आह़े दुष्काळाच्या या अहवालाला दीड मीटरने खोल गेलेल्या भूजल पातळीची जोडही देण्यात आली आह़े  केवळ 67 टक्के पावसाची नोंद झाल्याने जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तळोदा तालुक्यात दुष्काळ असल्याचा अंदाज वर्तवला गेला होता़ या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार माती, जमीन आणि पाणी या तीन निर्देशांकांच्या आधारे सत्यता पडताळणी सव्रेक्षण पूर्ण करण्यात आले होत़े हे सव्रेक्षण पूर्ण झाल्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी राज्यशासनाकडे अहवाल दिला गेला आह़े या अहवालात नंदुरबार, शहादा आणि नवापूर या तीन तालुक्यात गंभीर दुष्काळस्थिती असल्याचे नमूद करण्यात आले  आह़े तसेच तळोदा तालुका दुष्काळछायेत असल्याची माहिती दिली गेली आह़े  दुष्काळाची ही सत्यता पडताळून पाहणा:या पथकांनी त्या-त्या ठिकाणच्या भूजल पातळीचाही आढावा घेतला होता़ यात जागोजागी पाणी खोलच गेल्याचे  स्पष्ट करण्यात आले होत़े या तपासणीला भूजल सव्रेक्षण विभागाने ठोस पुरावा दिला असून त्यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार नंदुरबार जिल्ह्याची भूजल पातळी ही तब्बल 1़62 मीटरने खोल गेली आह़े सर्व सहा तालुक्यातील भूजल हे 1 मीटरपेक्षा अधिक खोल असल्याने येत्या काळात भूजल वाढीसाठी उपाययोजना करण्याचे विभागाने सुचवले आह़े  चार तालुक्यांमध्ये केलेल्या सत्यता पडताळणी अहवालावर चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बुधवारी जिल्हाधिका:यांची राज्यस्तरीय बैठक होणार असून यात नंदुरबार जिल्ह्याची स्थिती जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी हे मांडणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े  जिल्ह्यात चार दिवस राबवलेले सव्रेक्षण हे केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या निर्देशांकानुसार केल्याची माहिती असून यातून दुष्काळग्रस्त शेतक:यांना वाढीव मदत मिळणार असल्याचे महसूल विभागाने म्हटले आह़े दुष्काळाची घोषणा झाल्यास केंद्र आणि राज्यशासनाने घोषित केलेल्या पॅकेजनुसार दुहेरी किंवा तिहेरी मदत शेतक:यांना मिळणार असल्याची माहिती आह़े महसूल, कृषी आणि ग्रामपंचायत विभागाच्या पथकांनी नंदुरबार तालुक्यात भोणे, मालखड, आसाणे, ओसर्ली, कोठली, शिवपूर, फुलसरे, उमर्दे बुद्रुक, आष्टे, नवागाव, सोनगीर, काकर्दे, सुजालपूर, धमडाई आणि पथराई या गावांमध्ये आणि सोनगीर या पाडय़ावरही सव्रेक्षण केले होत़े शहादा तालुक्यात होळ, अलखेड, मोहिदे तर्फे शहादा, कवठळ तर्फे शहादा, करणखेडा, प्रकाशा, डामरखेडा, कळंबू, कोठली तर्फे सारंगखेडा, मातकूट, हिंगणी, ओझर्टा, दामळदा, तिधारे, चिरडे, आकसपूर, आडगाव, पिंप्री येथे सव्रेक्षण पूर्ण झाले होत़े तळोदा तालुक्यात बन, आष्टे तर्फे बोरद, सिलींगपूर, बुधावल, कुंडवा, रेटपाडा, माळ खुर्द आणि रोझवा पुनवर्सऩ नवापूर तालुक्यात खडकीपाडा, लहान कडवान, गडद, नागझरी, नवापूर, बिलबारे, डोकारे, वाटवी, दापूर, करंजी बुद्रुक, खोकसा, बिजादेवी, घोगळ, करंजाळी, मरोड यागावांमध्ये तसेच आमपाडा, मुगधन, मोगडाडोसाफळी, हिराबर्डी, धनबर्डी, उचमौली, भोमदीपाडा, बर्डीपाडा, मावचीफळी या पाडय़ांवर सव्रेक्षण पूर्ण करण्यात आले आह़ेभूजल सव्रेक्षण विभागाने सप्टेंबर महिन्यात सर्व सहा तालुक्यात 50 विहिरींमध्ये निरीक्षण प्रात्यक्षिक राबवले होत़े यात नंदुरबार तालुक्यातील 13 ठिकाणच्या विहिरी ह्या धोकेदायक स्थितीत होत्या़ तालुक्यात तब्बल साडेतीन अर्थात 3़52 मीटर भूजल खोल गेले असून येत्या काळात ही स्थिती आणखी भयावह होण्याची स्थिती अहवालात दर्शवली गेली आह़े तळोदा तालुक्यात 2़42, शहादा 1़10, अक्कलकुवा 1़48, धडगाव 1़7 तर नवापूर तालुक्यात 13 इंच भूजल खोल गेल्याची माहिती आह़े नंदुरबार आणि तळोदा तालुक्यातील भूजल ऑक्टोबरपूर्वीच दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने भूजल सव्रेक्षण विभागाने चिंता व्यक्त केली आह़े नंदुरबार 13, नवापूर 15, तळोदा 3, शहादा 9, अक्कलकुवा 6 आणि धडगाव तालुक्यातील 5 अशा एकूण 50 विहिरींचे निरीक्षण झाले होत़े सप्टेंबर अखेरीर्पयत सर्व तालुक्यात  5़79 मीटर भूजल पातळी स्थिर होती़ 50 पैकी 42 विहिरींचे भूजल वाढण्याऐवजी खालावल्याचे विभागाच्या निदर्शनास आल़े तर नवापूर 6 नवापूर तर शहादा आणि अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येकी 1 अशा आठ विहिरींच्या पातळीत वाढ झाली होती़