शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शहादा : 68 लाखांची दारु म्हसावद फाटय़ाजवळ पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मध्यप्रदेशातून धडगांवकडे अवैधरित्या विना परवाना जाणारी सुमारे 68 लाखांची दारु रविवारी रात्री म्हसावद फाटय़ाजवळ पकडली. मुंबई व नंदुरबार राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली़ याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात असून न्यायालयाने त्यांना 28 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  31 डिसेंबर तसेच नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मध्यप्रदेशातून धडगांवकडे अवैधरित्या विना परवाना जाणारी सुमारे 68 लाखांची दारु रविवारी रात्री म्हसावद फाटय़ाजवळ पकडली. मुंबई व नंदुरबार राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली़ याप्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात असून न्यायालयाने त्यांना 28 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  31 डिसेंबर तसेच नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर राज्य उत्पादन विभागाच्या मुंबई व नंदुरबार शाखेने रविवारी शहाद्यात मोठी कारवाई केली. मध्यप्रदेशातून मोठय़ा  प्रमाणात बनावट, विना परवाना दारुची वाहतूक केली जाते.  याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मुंबई व नंदुरबार विभागाच्या पथकाने रविवारी रात्री सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास म्हसावद फाटय़ाजवळ सापळा रचून ट्रक (क्र. एमएच 09 एचएफ 2891) ताब्यात घेतला. ट्रकची तपासणी केली असता त्यांत ‘बॉम्बे स्पेशल व्हिस्की’ व ‘लेमाँन्ट’ बियरचे 767 बाँक्स आढळुन आला. या ट्रकसह 55 लाख 36 हजार 740 रूपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेतला. कारवाई मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अशोक तारू, गौतम खंडागळे, प्रदीप अवचार, विकास सावंत, तसेच नंदुरबार भरारी पथकाचे निरीक्षक अविनाश घरत, एस़क़े कांडे, हंसराज चौधरी, राहुल सावळे, अजय रायते, धनराज पाटील यांनी केली. या प्रकरणात अशोक बालमुकुंद द्विवेदी व बलबिरसिंग महिपतसिंग कुशावह दोघे (रा. भोपाळ,मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात येऊन शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम़बी़ सोनटक्के यांच्या समोर हजर करण्यात आल़े दोघांना 28 डिसेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.