लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : बाजार समितीतील व्यवहार शुक्रवारी पूर्ववत सुरू झाल्याने 400 क्विंटल हरभरा व 150 क्विंटल गहू बाजार समितीत व्यापा:यांनी खरेदी केला. गेल्या महिनाभरापासून बाजार समितीचा ठप्प झालेला व्यवहार शुक्रवारी पुन्हा सुरू झाल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले.हरभ:याला हमीभाव मिळावा म्हणून गेल्या महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. हे आंदोलन चिघळल्याने आंदोलनकत्र्याच्या मागणीवरून बाजार समितीतील आठ व्यापा:यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. त्यामुळे महिनाभर बाजार समितीत शेतमालाची खरेदी-विक्री बंद झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाला होता. बाजार समितीत खरेदी बंद झाल्याने शेतक:यांचा शेतमाल पडून होता. लगAसराई असल्याने शेतक:यांना पैशांची गरज असूनही व शेतमाल असूनही केवळ बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होते. शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रात हरभरा विकूनही रोख रक्कम मिळत नसल्याने बाजार समितीचे व्यवहार कधी सुरू होतात याकडे शेतक:यांचे लक्ष लागून होते.बाजार समितीत व्यवहार बंद झाल्याने व्यापारीही अडचणीत आल्याने व्यापा:यांनी परवाने रद्द केल्याच्या सचिवांच्या आदेशाविरोधात सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपीलावर कामकाज होऊन सहायक निबंधकांनी सर्व व्यापा:यांचे परवाने पूर्ववत सुरू केल्याने शुक्रवारी व्यापा:यांनी बाजार समितीत शेतमालाची खरेदी सुरू केली. प्रशासक नीरव चौधरी, सचिव संजय चौधरी, व्यापारी प्रकाश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजार समितीचा व्यवहार सुरू झाला झाला. या वेळी व्यापारी व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महिनाभरापासून ठप्प झालेला व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले. बाजार सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे 400 क्विंटल हरभरा व 150 क्विंटल गव्हाची आवक झाली. हरभ:याला कमीत कमी तीन हजार रुपये ततर जास्तीत जास्त तीन हजार 800 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. बाजार समितीचे कामकाज शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ववत सुरू झाल्याने व्यापा:यांनीही समाधान व्यक्त केले.
शहादा बाजार समितीचे व्यवहार अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:49 PM