लोणखेडा : शहादा बायपासवर दुचाकीच्या धडकेत जखमी लिपिकाचा बुधवारी उपचारादरम्यान निधन झाले़ मयत लोणखेडा ता़ शहादा येथील सातपुडा विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते़लोणखेडा येथील काशिनाथ भाऊराव महाजन (३८) हे रविवारी दुचाकीने मालपूर ता़ शिंदखेडा येथे विवाह सोहळ्यासाठी जात असताना शहादा बायपास रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ यावेळी त्यांनी समोरील मोटारसायकलस्वारास वाचवण्याचा प्रयत्न केला़ यात काशिनाथ महाजन हे रस्त्यावर पडल्याने डोक्यावर जबर मार लागला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ दरम्यान बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.त्यांच्या उपचारादरम्यान सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील व सामाजिक कार्यकर्ते नुह नुरानी यांनी भेट देत डॉक्टरांसोबत चर्चा केली होती़ त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहिण, मेहुणे असा परिवार आहे.
शहादा बायपास रस्त्यावर दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 11:42 AM