लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आह़े यंदा 15 जागांसाठी होणा:या या निवडणुकीत 49 हजार 255 मतदार सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार व तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शासनाच्या नव्या नियमानुसार होणार आहेत़ यासाठीचे आरक्षण जाहीर झाले आह़े यामुळे विविध कार्यकारी संस्था व खुल्या जागांसाठी इच्छुक तयारी करत आहेत़ शहादा बाजार समितीत 10 जागा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव तर पाच जागा ह्या विविध जातीय आरक्षणांतर्गत राखीव आहेत़ तालुक्यात विविध कार्यकारी संस्थांच्या जागा यंदा वाढल्याने बाजार समिती ताब्यात घेण्याचा मार्ग विकासोतून जाणार आह़े त्यामुळे या संस्था ताब्यात असलेल्या नेत्यांकडून शहादा तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आह़े शासनाने यंदा काढलेल्या आदेशानुसार बाजार समिती किंवा तत्सम विविध कार्यकारी संस्था आणि आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे सभासद शेतकरी बाजार समितीच्या निवडणुकीवेळी मतदान करू शकणार आहेत़ शहादा बाजार समितीत खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त यासाठी प्रत्येकी 1, महिला राखीव 2 तर 10 जागा ह्या सर्वसाधारण गटासाठी आहेत़ मोहिदा तर्फे शहादा या सर्वसाधारण गणात 7 गावांचा समावेश करण्यात आला आह़े यातील 3 हजार 200 मतदार आहेत़ कहाटूळ या इतर मागासवर्गीय जागेसाठी 10 गावांचे 3 हजार 370 मतदार, कोंढावळ सर्वसाधारण जागेसाठी 11 गावांचे 3 हजार 245, वडाळी सर्वसाधारण जागेसाठी 8 गावे समाविष्ट असून येथे 3 हजार 252 मतदार आहेत़ कळंबू सर्वसाधारण जागेसाठी 5 गावांचे 3 हजार 324, अनुसूचित जाती राखीव जागा असलेल्या शिरूड गणात 14 गावांचा समावेश आह़े येथील मतदार संख्या 3 हजार 358 एवढी आह़े भटके विमुक्त प्रवर्गासाठी राखीव प्रकाशा गणात 5 गावांचे 3 हजार 351 सभासद मतदार मतदान करतील़तालुका बाजार समितीच्या गतवेळी झालेल्या निवडणुकीत 11 जागा ह्या विविध कार्यकारी संस्था आणि चार जागा ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून निवडून आणल्या गेल्या होत्या़ यासाठी केवळ 2 हजार 416 मतदार होत़े पाच वर्षात राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या शासनाच्या नवीन नियमांची बांधणी करून बाजार समितीच्या निवडणुकीत शेतक:यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा निर्णय घेतला आह़ेनवीन निर्णयानुसार यंदा 49 हजार शेतकरी मतदानासाठी तयार झाले शहादा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्यापूर्वी होणा:या या निवडणूक प्रक्रियेतून राजकीय पक्षांची नेमकी तयारीही दिसून येणार आह़े यामुळे या निवडणुकांना राजकीय पक्ष काळजीपूर्वक हाताळत असल्याचे चित्र आह़े येत्या काही दिवसात उमेदवार निवडीपासून ते ग्रामस्तरावर बैठकांर्पयत कार्यक्रम सुरू होणार आह़े यातही प्रत्यक्ष निवडणूक प्रचार करण्यासाठी उमेदवार हे शेतक:यांच्या घरांर्प्यत जाणार असल्याने पहिल्यांदाच बाजार समिती तळागाळार्पयत पोहोचण्याची आशा व्यक्त करण्यात येत आह़े बाजार समितीत मतदान करण्यास मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरीही उत्साहात आहेत़ यापूर्वी केवळ गावनिहाय पदाधिका:यांची निवडणूक झाल्यानंतर कळत होती़ यंदा मात्र मतदानाची संधी मिळाल्याने शेतक:यांमध्ये चर्चा रंगली आह़े
शहादा कृउबाससाठी 49 हजार मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:16 PM