लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : वीज वितरण कंपनीच्या शहादा ग्रामीण उपविभाग दोनअंतर्गत येणा:या ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांचे सुमारे 30 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे. या उपविभागात येणा:या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागाच्या भाग दोनमध्ये 108 ग्रामपंचायती ग्राहक आहेत. यात काही मोठय़ा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यापैकी ब्राrाणपुरी कक्षमधील गणोर, सुलतानपूर, बहिरपूर, कोचरा, ब्राrाणपुरी, खेडदिगर, पाडळदा कक्षामधील अलखेड, औरंगपूर, पाडळदा, कुढावद, चिखली, चिखली पुनर्वसन, बुडीगव्हाण, म्हसावद कक्षामध्ये फत्तेपूर, वीरपूर, मडकाणी, अमोदा, जुनवणे, पिंप्री, इस्लामपूर, लक्कडकोट, तलावडी व मंदाणे कक्षातील कमरावद, कोळपांढरी, नवीन असलोद, गोवळीपाडा, भुलाणे, घोडलेपाडा, मलगाव, सोनवल, चिखली, सावखेडा, चांदसैली या ग्रामपंचायतींकडे 30 कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. बिलांच्या वसुलीसाठी वीज कंपनीने धडक मोहीम सुरू करून गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या कारवाईमुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पथदिवेही बंद असल्यामुळे गावागावात अंधाराचे साम्राज्य आहे.वीज कंपनीने थकीत बिले भरण्याबाबत संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींनी याची दखल घेतली नाही म्हणून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने त्या त्या गावातील ग्रामस्थांना जंगलात जाऊन पाणी मिळवावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील मोठय़ा लोकसंख्येच्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. थकबाकीची रक्कम भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत न करण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतल्याचे समजते. त्यामुळे ग्रामपंचायतींकडून जोर्पयत थकबाकीची रक्कम भरली यात नाही तोपावेतो त्या त्या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागतील, असे चित्र दिसते. मोठय़ा गावांमधील पथदिवे बंद असल्याने चोरीच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे याबाबत तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहादा उपविभाग : वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:04 PM