लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील लोकमान्य टिळक टाऊन हॉल परिसरातून चोरीस गेलेला ट्रॉला इंदूर येथून जप्त करण्यात आला. दोन संशयीतांना देखील अटक करण्यात आली आहे. या चोरटय़ांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.19 सप्टेंबर रोजी रात्री जुना प्रकाश रोडवर दहा चाकी ट्रॉला (एमएच-17 टी. 9381) उभा होता. त्यात पुल बांधकाम करण्याचे लोखंडी साहित्य होते. रात्रीतून चोरटय़ांनी तो लंपास केला. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी महारु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी स्वतंत्र पथके तयार केली होती. पोलिसांना सावळदा, फैजपूर , सावदा, ब्रहानपूर मार्गे ट्रक गेल्याची माहिती मिळाली होती. शोध घेत घेत पथक इंदोर येथे पोहचले. तेथील रफिक खा मन्सुरी (वय 43), 336 चंदन नगर यांचे आर. के. डिस्पोजल ट्रान्सपोर्ट असल्याची माहिती मिळाली. पथकाने स्थानिक पोलिस अधिकारी यांच्या सहकायराने रफिक मन्सूरी यांचे ट्रान्सपोर्ट गाठले. तेथे चोरी गेलेल्या ट्रकची नंबर प्लेट, चेचीस नंबर आढळून आली. पोलिसांनी मन्सुरी यास विचारणा केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर ट्रक बॉडी, इंजिन, टायर, ट्रक मधील लोखंडी एंगल असे तेजाजी नगर येथून काढून दिले. चोरीस गेलेला ट्रक सर्वच स्पेअर पार्ट बॉडी चार तासातच विल्हेवाट करून ठेवली होती. म्हणून गॅरेजच्या मालकासह अब्दुल रहीम मोहम्मद सिकंदर मन्सुरी रा. चंदन नगर, इंदूर येथून ताब्यात घेतले असून इतर आरोपीचा शोध घेत आहेत. यातून अंतरराज्यीय टोळी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दीपक फुलपगारे, हवालदार दीपक परदेशी, मनोज सरदार, पोलीस नाईक राजेंद्र गावित, प्रकाश तमखाने, स्वप्निल गोसावी, विकास कापूरे, अमोल राठोड, मनोज महाजन आदींनी ही कारवाई केली.
शहादा चोरीचा ट्रक इंदोर येथून जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 1:02 PM