शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

शहाद्यातील एटीएम फोडणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:59 PM

पोलीस कोठडी : मध्य प्रदेशातील निमज येथून घेतले ताब्यात, सहा संशयीत अद्यापही फरारच

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : लोणखेडा रस्त्यालगत सिध्दी विनायक मंदिरासमोरील युनियन बँकेचे एटीएम मशिन फोडून त्यातुन 3 लाख 12 हजार रुपये चोरीप्रकरणी ताहीर उर्फ राजू गफूरखान, रा. गुराका जि. पलवल (हरियाणा) यास निमज (म.प्र )           येथून शहादा पोलिसांनी  अटक            केली. त्यास न्यायालयात हजर            केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेतील  आरोपीचे अन्य सहा साथीदार फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी लवकरच पुन्हा पथक पाठविण्यात येणार आहे. लोणखेडा चाररस्ता लगत वर्दळीच्या ठिकाणी सिध्दी विनायक मंदिरासमोर युनियन बँकेचे एटीएम आहे. 23 मार्च  रोजी मध्यरात्रीच्या सुमारास साधारण एक ते चार वाजेदरम्यान अज्ञात चोरटय़ांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएमचा              दरवाजा कापून त्यातून तीन लाख             12 हजार रुपये चोरुन नेल्याची             घटना घडली होती. सकाळी  सव्वाआठ वाजेचा सुमारास युनियन बँकेचे एटीएम  फोडल्याची सुचना भ्रमणध्वनीद्वारे बँक व्यवस्थापक श्रीधर राऊत याना मिळाली.                त्यांनी त्वरीत उपविभागीय पोलीस अधिकारी एम.बी.पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, प्रभारी पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक बडगुजर, एस.बी.शिंदे पोलीस कर्मचारी मनोज सरदार, जलाल शेख, भटु धनगर, स्वप्निल गोसावी, विकास कापूरे, देवा गावीत, मनोज महाजन घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे  एटीएम लगत हॉटेल असून रात्री उशिरा एक वाजेपयर्ंत ते सुरू असते. शिवाय सूतगिरणी कामगारांची रेलचेल सुरू असते. वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम फोडून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. या घटनेने सर्वत्र           खळबळ उडाली होती पोलिसांनी चोरटय़ांचा मागोवा घेण्यासाठी  नंदुरबार येथून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले  होते. मात्र त्यातून पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. घटनेचा उलगडा होण्यासाठी उपअधीक्षक एम.बी.पाटील ,पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकही पाठविण्यात आली होती.पोलिसांचा तपास सुरू असतानाच केंट, जि.निमज (मध्य प्रदेश) पोलिसांनी येथील पोलिसांना हरियाणा राज्यातील  एटीएम  फोडून जबरी चोरी करणा:या टोळीचा म्होरक्या ताहीर ऊर्फ राजू गफूरखान रा.गुराका  ता.हातींन जिल्हा, पलवल (हरियाणा ) यास अटक केली होती. गफूरखान याने महाराष्ट्रात  शहादा येथेही एटीएम फोडल्याची कबुली दिल्याने निमज पोलिसांनी तात्काळ शहादा पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक दीपक बागुल, हवालदार भरत बाविस्कर  यांच्या पथकाने निमज येथे जाऊन आरोपी  ताहीर ऊर्फ राजू गफूरखान यास शहादा येथे आणले. त्यास न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचे अन्य सहा साथीदार फरार झाले आहेत तपास उपनिरीक्षक दीपक बागुल करीत आहेत.