शहादा : रमकूबाई नगरात प्रांताधिकारी कार्यालयात दरवाजाची कडी व कुलूप तोडून चोरांनी चोरीचा प्रय} केला. हे कार्यालय रहिवासी परिसरात असल्याने घर समजून चोरांनी चोरीचा प्रय} केल्याचा अंदाज आहे. परंतु त्यांना खाली हात परतावे लागले.गेल्या दोन दिवसांपासून शासकीय सुटी होती. परिणामी प्रांताधिकारी कार्यालयाला कुलूप होते. शनिवारी रात्री चोरटय़ांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी सर्व कार्यालयातील खोल्यांची तपासणी केली असता कागदपत्र आणि संगणक आढळून आले. प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्या कॅबिनमधील टेबलाचे सर्व ड्रावर तपासले असता त्यात काही आढळून आले नाही. कार्यालयातील सर्व कागदपत्रे सुस्थितीत आहेत, संगणक असून चोरांचा चोरी करण्याचा प्रय} फसला आहे. सोमवारी सकाळी कार्यालयातील महिला कर्मचारी सकाळी नऊ वाजता कार्यालय उघडण्यासाठी आले असता कर्मचा:यांनी तहसीलदार मनोज खैरनार यांना ही माहिती दिली. तहसीलदारांनी पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना घटनेची माहिती दिली असता त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस कर्मचारी जालल शेख, विकास कापुरे, स्वप्नील गोसावी, देवा गावीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.प्रांताधिकारी कार्यालय हे भरवस्तीत असल्याने चोरांना गेल्या दोन दिवसांपासून कुलूप दिसल्यामुळे त्यांनी याठिकाणी चोरीचा प्रय} केला. चोरांना काहीच न मिळाल्याने हताश होऊन परतावे लागले. शहरात चोरीच्या घटनांचा क्रम सुरूच आहे. परंतु शासकीय कार्यालयात चोरी करण्याचा चोरांचा हा पहिलाच प्रसंग असल्याने शासकीय कार्यालयदेखील सुरक्षित नाहीत, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.प्रांत कार्यालयामार्फत विविध प्रकारच्या दंडांची शुल्क वसुली जोरात सुरु आहे. गुरुवारी व शुक्रवारी जमा झलेल्या दंडाची रक्कम शनिवारी व रविवारी बँकेला सुटी असल्यामुळे ती बँकेत जमा न करता ती कार्यालयात ठेवण्यात आली. नेमकी हीच संधी चोरटय़ांनी साधली. कार्यालयात मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम जमा असल्याची माहिती लिक झाल्यामुळे चोरी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शहाद्याच्या इतिहासात पाहिल्यांदाच शासकीय कार्यालयात धाडसी चोरीचा प्रयत्न झाला.
शहाद्यात प्रांत कार्यालय चोरटय़ांनी फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:46 AM