ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.4 : शहादा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको करण्यात आला़ रास्तारोको वगळता जिल्ह्यात सर्वत्र शुकशुकाट असून संप मागे घेतल्याचे शेतक:यांनी म्हटले आह़े यामुळे सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये कामकाज होणार आह़े
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घन:श्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनात शहादा येथे ब:हाणपूर- अंकलेश्वर राज्यमार्गावर पेट्रोलपंप समोर रास्तारोको आंदोलन करण्यात आला़ शेतक:यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य करून पेन्शन द्यावी अशा घोषणा यावेळी उपस्थित 100 ते 150 कार्यकत्र्याकडून देण्यात येत होत्या़ सकाळी 9़30 वाजता झालेल्या या आंदोलनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ पाऊण तास सुरू असलेल्या आंदोलनांनंतर पोलीसांनी आंदोलकांवर कारवाई करून ताब्यात घेत सोडून दिल़े
शेतक:यांनी कजर्माफी देणार असल्याचे शासनाने जाहिर केल्यानंतर जिल्ह्यातील शेतक:यांचा विरोध मावळल्याचे चित्र आह़े बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून भूईमूग आणि मकासह गव्हाची आवक होण्याची चिन्हे आहेत़ गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीमाल पडून असल्याची माहिती देण्यात आली आह़े