शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

शहादा येथील स्टेट बँकेची फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्टेट बँकेतून पावणेचार लाख रुपये मालमत्ता तारण न करता कर्ज घेतले. त्यानंतर तीच मालमत्ता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्टेट बँकेतून पावणेचार लाख रुपये मालमत्ता तारण न करता कर्ज घेतले. त्यानंतर तीच मालमत्ता परस्पर विकून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी शहादा येथील एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा येथील गरीब नवाज कॉलनी भागात राहणारे हलीम शेख कादत शेख कुरेशी यांनी ऑगस्ट 2007 ते जानेवारी 2012 या दरम्यान स्टेट बँकेकडून तीन लाख 75 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यासाठी लागणारी मालमत्ता त्यांनी तारण करून देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर 2012 ते डिसेंबर 2018 या दरम्यान मलोणी शिवारातील तीच मालमत्ता कुरेशी यांनी परस्पर विकून दिली. यामुळे बँकेची तीन लाख 75 हजार रुपयांची फसवणूक झाली. याबाबत बँक मॅनेजर विनय दामोदर सोनवणे यांनी चौकशी करून हलीम शेख कादत शेख कुरेशी यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून कुरेशी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार पवार करीत आहे.