लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तिस:या अपत्याच्या कारणावरून शहादा पालिकेतील राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक सलीम शेख यांचे सदस्यपद रद्द केल्याचा निर्णय जिल्हाकिारी यांनी दिला होता़ या आदेशाला नगरविकास राज्यमंत्र्यांनी तात्पुरता स्थगिती आदेश दिल्याने नगरसेवक सलीम शेख यांना दिलासा मिळाला आह़े डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या शहादा पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्र.7 ब मधून शेख इकबाल शेख सलीम हे राष्ट्रवादी काँगेस पक्षातर्फे निवडून आले होत़े शेख यांनी काँग्रेसचे राकेश पाटील यांचा पराभव केला होता. निवडणुकीनंतर शेख यांना तिसरे अपत्य झाल्याने काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मकरंद पाटील यांनी शेख यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती़ या तक्रारीवरुन जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन चौकशीअंती महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 16 व 44 प्रमाणे शेख इकबाक शेख सलीम यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे अपात्र घोषित करुन प्रभाग क्र.7 ब चे सदस्यपद रिक्त असल्याचा निर्णय 20 नोव्हेंबरला दिला होता. या निर्णयाच्या विरोधात शेख यांनी राज्य सरकारकडे अपील दाखल केले होत़े त्यावर नगरविकास राज्यमंत्री यांनी जिल्हाधिका:यांच्या आदेशास पुढील आदेश येईपर्यत तात्पुरती स्थगिती दिली आहे. मंत्रालयातून हे आदेश नुकतेच प्राप्त झाले आह़े
शहाद्याचे नगरसेवक शेख यांचे पद अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:38 PM