शहादा : राज्यासह देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. मात्र शहरातील व्यावसायिकांकडून रस्त्यांवरील मोकळ्या जागांवर कचरा टाकण्यात येत असल्याने तेथे कचराकुंडय़ा तयार झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरत असून, याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील विविध भागांमध्ये फेरफटका मारला असता बहुतेक ठिकाणी अशीच परिस्थिती दिसून आली. पालिकेतर्फे कचराकुंडी न ठेवल्याने नागरिक व व्यावसायिकांकडून उघडय़ावरच कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरून विविध भागातील मुख्य रस्त्यांवर कच:याचे ढीग तयार झाले आहेत. एकीकडे मलेरिया, टायफाईड, डेंग्यूसारखे भयानक आजार डोकेवर काढत असतांनादेखील पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसून येत नाही.भाजी मंडई परिसरात असलेल्या व्यावसायिकांकडून मुख्य चौकात कचरा व नासका भाजीपाला टाकण्यात येत असल्याने कच:याचा मोठा ढीग होतो. याठिकाणी वराह व मोकाट गुरांचा वावर असल्याने दरुगधी पसरून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या परिसरात जाणेही कठीण झाले आहे. याठिकाणी व्यावसायिकांना समज देवून कचराकुंडी ठेवल्यास हा प्रश्न सुटू शकतो. या परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांनादेखील येथेच कचरा व नासका भाजीपाला टाकण्याची सवय झाली आहे. याठिकाणी स्वच्छता केल्यास काही वेळानंतर पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. त्यामुळे रस्त्यावर कचरा टाकणा:यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.शहरातील शहीद अब्दुल हमीद चौकातील स्मारकाजवळच कचरा टाकण्यात येत असल्याने या परिसराची शोभा लयास जात आहे. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना व वनविभाग कार्यालयासमोर खासदार निधीतून खेळाडूंसाठी क्रीडा भवन बांधण्यात आले आहे. हे क्रीडा भवन आता बंद अवस्थेत असल्याने त्याच्या मुख्य प्रवेशद्वारातच कचरा टाकण्यात येतो.दरम्यान, पालिकेने स्वच्छतेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करून अशाप्रकारे मुख्य रस्त्यांवर कोणाचाही धाक न बाळगता बिनधास्तपणे रस्त्यावर कचरा टाकून शहर विद्रुप करणा:या व्यावसायिकांवर पालिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
स्वच्छ भारत अभियानाची शहाद्यात ‘एैसी-तैसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2019 7:09 PM