नंदुरबार : ईशान्येकडून येणा:या शितलहरी उत्तर महाराष्ट्रात स्थिरावल्याने थंडीची लाट थेट जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ार्पयत कायम राहणार आह़े गुरुवारी नंदुरबारात किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेल़े यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वाधिक निच्चांकी तापमान होत़े जळगाव 8.4 तर धुळ्यात 9.2 इतके किमान तापमान नोंदविण्यात आल़े साधारणत: 27 ते 28 डिसेंबरपासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीची लाट पुन्हा परतणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आला होता़ हा अंदाज खरा ठरत गुरुवारपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचे पुन्हा जोरदार पुर्नरागमण होताना दिसत आह़े साधारणत 23 ते 26 डिसेंबरच्या काळात खान्देशासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले होत़े परंतु गुरुवारी पुन्हा थंडीत वाढ झाल्याने अनेक शहरांमध्ये हुडहुडी भरली होती़ उत्तर भारतात मोठय़ा प्रमाणात शितलहरींचा प्रभाव वाढला आह़े त्यातच हिमवृष्टीमुळे थंडीची लाट पसरली आह़े ईशान्येकडील हवेच्या दाबात वाढ झाल्याने तेथील वारे उत्तर महाराष्ट्रात स्थिरावले आहेत़ हीच स्थिती कायम राहणार असल्याने नवीन वर्षातील पहिल्या आठवडय़ात थंडीचा प्रभाव कायम राहणार आह़े सध्या महाराष्ट्रात 1 हजार 16 हेक्टापास्कल तर उत्तर महाराष्ट्रात 1 हजार 18 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झालेला आह़े हवेचा दाब जितका जास्त तितकी थंडीतही वाढ होत असते असे सूत्र आह़े उत्तर महाराष्ट्रात हवेचा दाब वाढला आह़े परिणामी नंदुरबारात यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान नोंदविण्यात आले आह़े त्याच प्रमाणे गुरुवारी नाशिक 5.7, निफाड 1.8, जळगाव 8.4, धुळे 9.2 इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आह़े ईशान्येकडील वा:यांचा प्रभाव साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ार्पयत कायम राहणार आह़े त्यामुळे तोर्पयत थंडीची लाट कायम राहणार आह़ेईशान्येकडून शितलहरींचा प्रभाव वाढला आह़े जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ार्पयत थंडी कायम राहणार आह़े उत्तर महाराष्ट्रात 1 हजार 18 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब निर्माण झालाय़ -डॉ़ रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ, पुण़े
ईशान्येकडील शितलहरी उत्तर महाराष्ट्रात स्थिरावल्या
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: December 27, 2018 5:26 PM
जानेवारीर्पयत थंडी कायम : नंदुरबार प्रथमच 9 तर, जळगाव 8 अंशावर
ठळक मुद्देमहाराष्ट्रात 1 हजार 18 हेक्टापास्कल इतका हवेचा दाबजानेवारीच्या पहिल्या आठवडय़ार्पयत थंडी कायमउत्तर महाराष्ट्रात 1 हजार 18 हेक्टापास्कल