ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : शिवजयंतीनिमित्त तालुक्यातील सकल मराठा समाज व शिवप्रेमींतर्फे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शाहीर शिवश्री राजेंद्र कांबळे यांचा पोवाडय़ाचा कार्यक्रम झाला.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.बी. नायकवाड होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्त झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, दिवाणी न्यायाधीश दैठणकर, सोनटक्के, श्याम जाधव, अॅड.सुशील पंडित, हैदरअली नुरानी, अॅड.अल्ताफ हासमानी, अरविंद कुवर, प्रा.दत्तात्रय शिंदे, डॉ.उल्हास देवरे, अॅड.राजेश कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत जगाला संस्काराचा ठेवा देणा:या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित माजी मुख्यमंत्री कन्नमवार लिखीत पुस्तक भेट देऊन करण्यात आले. या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.या वेळी शाहीर कांबळे यांनी शिवरायांचे कार्य, आई जिजाऊंचे संस्कार व शहाजीराजांचे कर्तव्य महानता कशी श्रेष्ठ होती हे पोवाडय़ाच्या माध्यमातून मांडले. जगाच्या पोशिंद्याचे आजचे जीवन कसे हलाखीचे झाले यावरही हृदयद्रावक वर्णन त्यांनी सादर केले. सकल मराठा समाज व शिवप्रेमींचा हा उपक्रम आजच्या आधुनिक दुनियेत वावरणा:या सैराट तरुणांना भानावर आणण्यासाठी कसा उपयुक्त होऊ शकतो हे शेवटच्या पोवाडय़ातून त्यांनी सादर केले.
शिवजयंतीनिमित्त शहाद्यात पोवाडय़ाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:32 PM