लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील हि.गो. श्रॉफ हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणेतर्फे घेण्यात आलेल्या हिंदी प्रवेश, प्रारंभ, व प्राविण्य या परीक्षेत यश संपादन केले.हिंदी परीक्षेत श्रुती महेंद्र चौधरी ही पुणे विभागात प्रथम तर नीलिमा हरीश अहिरे व हर्ष राकेश सोनार हे शाळेत द्वितीय तर हितेश दिलीप माळी हा तिसरा आला. या परीक्षेत एकूण १८ विद्यार्थ्यांना विशेष योग्यता तर दहा विद्यार्थ्यांना प्रथमश्रेणी मिळाली. प्रारंभ परीक्षेत भूमिका शिवाजी पाटील ही पुणे विभागात प्रथम आली. द्वितीय कल्याणी सुनील पाटील तर तृतीय भूमिका अशोक पाटील. या परीक्षेत दहा विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. प्राविण्य परीक्षेत मोहिनी पंकज बोरसे या विद्यार्थिनीने विद्यापीठात प्रथम स्थान प्राप्त केले. तर द्वितीय वैष्णवी जयंत रघुवंशी, तृतीय रेवती दिपक माळी. या परीक्षेत १२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सुषमा शहा उपमुख्याध्यापक राजेश शहा, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया व जगदीश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पेन देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना हिंदी विभाग प्रमुख प्रमोद पाटील, गीता महाजन, सुनील राणा या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
टिळक विद्यापीठ परीक्षेत ‘श्रॉफ’च्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 1:12 PM