तळोदा : येथील कांचमाळी समाज पंच मंडळातर्फे आठवा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी समाजाच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी 11 जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. याप्रसंगी वधू-वरांकडील व:हाडींनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती.श्री समस्त कांचमाळी समाजातर्फे रविवारी येथील माळी समाज मंगलकार्यालयात हा सामूदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर खासदार हिना गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य भरत माळी, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, पालिकेचे प्रतोद संजय माळी, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण माळी, देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार, चुणिलाल सूर्यवंशी, नारायण माळी, नीळकंठ महाजन, बांधकाम सभापती भास्कर मराठे, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी, योगेश पाडवी, जितेंद्र सूर्यवंशी, सतिवान पाडवी, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, योगेश मराठे, प्रसाद सराफ, कॉलेज ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रा.सुधीर माळी, पंच मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मगरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी समाजातील 11 वधू-वरांचे शुभमंगल लावण्यात आले. या वेळी खासदार हिना गावीत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाजामध्ये सामुदायिक विवाह मोठय़ा प्रमाणात झाले पाहिजे. ज्यामुळे मोठा अनावश्यक खर्च टळत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंच मंडळाचे सचिव प्रा.मित्तल टवाळे व प्राचार्य अजित टवाळे यांनी केले.कार्यक्रमास वधू-वरांकडील व:हाडी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी पंच मंडळाचे उपाध्यक्ष विनायक माळी, मधुकर मगरे, गिरधर सागर, उखा पिंपरे, अरविंद मगरे, भिका मगरे, विजय शेंडे, अनिल मगरे, लक्ष्मण सागर, मोहन सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, राजाराम राणे, जयेंद्र सूर्यवंशी, वतनकुमार मगरे, भगवान मगरे, हिरालाल कर्णकार, महेश माळी, भगवान कर्णकार, भानुदास राजकुळे, पंकज राणे, सुनील सूर्यवंशी, आंबालाल चव्हाण, शशिकांत सूर्यवंशी, पंकज शेंडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा लतिका मगरे, मनिषा प्रविण मगरे, जयश्री राजेंद्र मगरे आदींसह समाजातील युवकांच्या विविध मंडळांनी परिश्रम घेतले होते.
तळोद्यात 11 जोडप्यांचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:01 PM