शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

पशुसंवर्धन विभागाला समस्यांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 2:25 PM

उदासिनता : रिक्त जागांची समस्या, वाहनांअभावी करावी लागतेय पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागामधील समस्या थांबवण्याचे नाव घेत नाहीत़ पशुधन विकास अधिका:यांच्या रिक्त जागा तसेच विभागाकडे स्वताची वाहने नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करवा लागत असल्याची माहिती आह़े पशुसंवर्धन विभागाला शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कॅम्प तसेच दौ:यांचे आयोजन करावे लागत असत़े परंतु दळणवळणासाठी स्वताच्या विभागाचे चारचाकीदेखील नसल्याने जिल्ह्यात दौरे करावे कसे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आह़े त्याच प्रमाणे एखादवेळी आजारी पशुवर उपचार करण्यासाठी त्याची ने- आण करावी लागत असत़े परंतु वाहन नसल्याने याला अडथळे निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आह़े जिल्ह्यात एकूण 29 पशुधन विकास अधिका:यांच्या जागा रिक्त आहेत़ वर्ग 1 अधिका:यांच्या असलेल्या या जागा मंत्रालयातूनच भरण्यात येत असतात़ त्यामुळे याचा पाठपुरावा प्रशासनाच्या वरीष्ठ स्तरावरच होणे गरजेचे असत़े त्याच प्रमाणे पशुधन पर्यवेक्षकांच्याही सात जागा रिक्त आहेत़ त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक  अडचणी येत असल्याच्या तक्रारी पशुपालकांकडून करण्यात येत आह़े पशुवैद्यकीय अधिका:यांच्या रिक्त जागांचा सर्वाधिक फटका तळोदा तालुक्यातील बोरद व मोड येथील पशुपालकांना बसत असल्याचे दिसून येत आह़े  बोरद व मोड मिळून 28 गावे  पशुवैद्यकीय अधिका:यांपासून वंचित आहेत़ त्यामुळे पशुपालकांना व्यवस्थित मार्गदर्शनही मिळत नसल्याच्या व्यस्था पशुपालकांकडून मांडण्यात येत आहेत़ संपूर्ण तालुक्यात केवळ मोड, मोदलपाडा व कोठार याच ठिकाणी पशुवैद्यकीय अधिका:यांची पदे भरण्यात आली आहेत़ तर उर्वरीत प्रतापपूर, सोमावल, बोरद,  तळोदा पंचायत समिती, तालुका लघु पशु चिकित्सालय तळोदा या ठिकाणी  पशुवैद्यकी अधिकारी नसल्याने पशुपालकांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत़ याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांकडून अधिकारी वर्गाची भेट घेण्यात आली़ तसेच              रिक्त जागा त्वरीत भरण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आह़े परंतु  याकडे वरीष्ठ पातळीवरील प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने हा प्रश्न प्रलंबितच राहत आह़े त्यामुळे याचा नेहमीच पशुपालकांना त्रास होत असतो़ सध्या संक्रमनाचे दिवस   असतात़ त्यामुळे या दिवसांमध्ये दुभती जनावरे यांना विविध रोगांची बाधाही होत असत़े परंतु पशुवैद्यकीय अधिका:यांच्या  रिक्त जागांमुळे पदावर कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिका:यांना सर्व तालुक्याला न्याय देता येणे शक्य नसत़े परिणामी पशुपालक योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहत असतात़ संपूर्ण तालुक्यात केवळ तीनच पशुवैद्यकीय अधिकारी आहेत़ त्यामुळे ब:याच गावांचा अतिरिक्त कार्यभार या तीन पशुवैद्यकीय अधिका:यांना सांभाळावा लागत असतो़ त्यामुळे साहजिकच याचा कामावर प्रचंड परिणाम जाणवत असतो़ वरीष्ठ पातळीवरील प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या कित्तेक वर्षापासून या रिक्त जागा भरल्या गेल्या नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरीत रिक्त जागा भरण्याची मागणी आह़ेआतार्पयत तळोदा तालुक्यात केवळ 396 पशुची त्यांच्या मालकांच्या आधार कार्डसोबत जोडणी करण्यात आली असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ़ किशोर सामुद्रे यांनी दिली़ त्यामुळे पशुवैद्यकीय अकिधा:यांच्या रिक्त जागांचा प्रश्न या ठिकाणीही जाणवत आह़े बोरद 148, मोड 78, मोदलपाडा-इच्छागव्हाण 90, सोमावल 30, प्रतापपूर 50 याच ठिकाणी केवळ पशुपालकांच्या आधारशी जोडणी करण्यात आली आह़े त्यामुळे उर्वरीत गावे अजूनही पशुवैद्यकीय अधिका:यांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आह़े