धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथील माजी सरपंच सीताराम नुरला पावरा यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने तोरणमाळ येथील सीताराम नुरला पावरा यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी सीताराम नुरला पावरा यांना दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा निरीक्षक सत्यजित सिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा निरीक्षक सत्यजित सिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी, राजेंद्र पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केेले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सीताराम पावरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:26 AM