नंदुरबार : जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या ऊस पळवापळवीच्या घटनेमुळे साखर हंगामाची अवघ्या तीन महिन्यातच सांगता झाली आहे. तीनपैकी दोन कारखाने बंद झाले असून, एका कारखान्याच्या हंगामाची सांगता आठवडाभरात होणार आहे. यंदा तिन्ही कारखान्यांनी सहा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सातपुडा, आदिवासी आणि अॅस्टोरिया हे तिन्ही साखर कारखाने सुरू झाले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून हंगाम सुरू झाला. मात्र जिल्ह्यातून यंदा मोठय़ा प्रमाणावर बाहेरील कारखान्याकडे ऊस गेला. परिणामी हंगामाची लवकर सांगता झाली. तीनपैकी आदिवासी कारखान्याने गेल्या महिन्यातच गाळप बंद केले होते. तर सातपुडय़ाचीही सांगता झाली आहे.
सहा लाख क्विंटल साखर उत्पादन
By admin | Published: February 05, 2017 12:41 AM