लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेतील बोगस शिक्षक भरती प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 शिक्षकांपैकी सहा जणांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजुर केला.अपंग युनिटअंतर्गत बोगस कागदपत्रे व बोगस नियुक्तीपत्राच्या आधारे 71 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. त्यापैकी 31 शिक्षकांवर जिल्हा परिषदेन गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पोलिसांनी 12 जणांना महिनाभरापूर्वी अटक केली आहे. एकास यापूर्वीच जामीन मिळाला आहे. उर्वरित 11 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी सहा जणांना गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. त्यात अमोल सुरेश शिंपी, रा.पाटोंदा, ता.चाळीसगाव, रवींद्र नागराज पाटील, रा.पथराड, ता.भडगाव, किरण हिरामण पाटोळे, रा.पिंपरीहाट, ता.भडगाव, संदीप रमेश पाटील, रा.पारोळा, रोशन सुभाष मोरे, रा.अंचाळे, ता.धुळे व सचिन वसंत मराठे, रा.चिंचखेडे, ता.धुळे यांचा समावेश आहे. त्यांच्यातर्फे अॅड.प्रेम इंदिस यांनी काम पाहिले.
बोगस शिक्षक भरती प्रकरणातील सहा जणांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:54 AM