लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील गट-गणांमधील मतदान केंद्रावरील सुविधांसाठी येथे प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात झोनल अधिकाºयांची बैठक घेण्यात आली होती. तथापि, या बैठकीत सहा झोलन अधिकाºयांनी दांडी मारल्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्याची सूचना सहाय्यक जिल्हाधिकाºयांनी दिली आहे. त्यामुळे त्यांना नोटिसा बजाविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सुविधांकरीता तत्काळ सर्वे करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश झोलन अधिकाºयांना दिले आहे.नंदुरबार जिल्हा परिषद व तळोदा पंचायत समितीची निवडणूक पुढील महिन्यात घेण्यात येत आहे. येत्या १७ तारखेपासून त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तळोदा तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे १० गण आहेत. मतदानासाठी साधारण १०८ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमिवर येथील निवडणूक प्रशासनाकडूनदेखील नियोजन करण्यात येत आहे. यासाठी साधारण १३ झोनल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.तळोदा तालुका अतिशय दुर्गमभागात विखुरलेला आहे. साहजिकच मतदान केंद्रांमध्येदेखील भौतिक सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान निर्माण होत असते. या गोष्टी लक्षात घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी शनिवारी आपल्या कार्यालयात नियुक्त केलेल्या क्षेत्रिय अधिकारी अर्थात झोनल अधिकाºयांची बैठक बोलविली होती. तथापि १३ पैकी सातच झोनल अधिकारी बैठकीस उपस्थित होेते. बैठकीसाठी निवडणूक प्रशासनाने संबंधीत अधिकाºयांना पत्रे पाठविली होती, असे त्या प्रशासनाचे म्हणणे आहे. बैठकीला दांडी मारणाºया अधिकाºयांना नोटीसा बजावून लेखी खुलासा देण्याची सूचना प्रांताधिकारी पांडा यांनी संबंधितांना दिले. त्यामुळे त्यांना तत्काळ नोटीसा बाजविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान यातील दोघ अधिकारी आपल्या कार्यालयीन कामासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी पांडा यांनी तळोदा तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाच्या दृष्टीने भौतीक सुविधा व इतर व्यवस्था उपलब्ध होण्याकरीता सर्वे करण्याच्या सूचना झोनल अधिकाºयांना दिल्या.तात्काळ आपण सर्वे करून तसा अहवाल प्रशासनास द्यावा. म्हणजे जेणे करून आतापासूनच तेथे सुविधांसाठी प्रयत्न केले जातील. त्याच बरोबर गट-गणांची रचना, मतदान केंद्रे, मतदार संख्या, अशी वेगवेगळी माहिती नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी दिली. सूत्रसंचालन नायब तहसीलदार एस.पी. गवते यांनी केले.कुठलीही निवडणूक असो मतदान केंद्रासाठी मुख्यता जिल्हा परिषद शाळांचाच वापर केला जात असतो. मात्र बहुसंख्य जिल्हा परिषद शाळांमध्ये विजेची समस्या उद्भवत असल्याचे निवडणूक कर्मचारी सांगतात. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीदेखील असे चित्र दिसून आले होते. एका मतदान केंद्रावर तर चक्क आकडे टाकून वीज घेण्याचा प्रकार दिसून आला होता. वीजवितरण कंपनीकडून थकीत वीज बिलापोटी कनेक्शन कट करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने याप्रकरणी दखल घेऊन तेथील वीज बील भरून पुरवठा सुरळीत करण्याची आवश्यकता आहे, तशी मागणीही गावकºयांनी केली आहे.
सहा झोनल अधिकाऱ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:25 PM