लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : तळोदा तालुक्यातील भवर ते धवळीविहीर गावादरम्यान रस्त्यावर बांधलेल्या फरशीपूलाचा स्लॅब कोसळल्याने वाहनधारकांचे जीव टांगणीला लागले आहेत़ स्लॅब कोसळल्याने मार्गावरुन होणा:या 10 गावातील वाहतूकीवर परिणाम झाला आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत़ यातच गेल्या काही दिवसांपासून भवर नदीला पाणी आले आह़े नदीला आलेल्या पुरामुळे भवर ते धवळीविहिर दरम्यान पुलाचा स्लॅब कोसळून मोठे नुकसान झाले आह़े स्लॅक कोसळूनही तेथून वाहतूक सुरु आह़े धोकादायक स्थितीत असलेल्या पुलाच्या लोखंडी सळ्या वर आल्याने धोकेदायक ठरत आहेत़ जीर्ण झालेला फारशी पूल ढासळण्याची शक्यता असतानाही नाईलाजाने वाहनधारक या पुलावरुन ये-जा करत आहेत़ ग्रामीण भागात असल्याने संबंधित प्रशासनाकडून धोक्याची सूचना देणारा लाल ङोंडा व सूचना फलकदेखील लावलेला नसल्याने रात्रीच्यावेळी पुलावरून वाहन खाली कोसळून अपघात होण्याची शक्यता आह़े फरशीपुल असला तरी पात्र खोल झाल्याने पुलाची उंची वाढली आह़े यातुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता आह़े बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आह़े
भवर ते धवळीविहिर दरम्यान फरशीपुलाचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:00 PM