कोठार, जि.नंदुरबार : तळोदा तालुक्यातील विविध भागात वृक्षतोड करून त्याची विक्री करणा:या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत़ त्यांच्याकडून झाडांना आग लावून झाडांची कत्तल सुरू आह़े हे प्रकार वनविभागाने थांबवण्याची मागणी करण्यात आली आह़े
तालुक्यातील मोड गावालगत गेल्या आठवडय़ात चिंचेच्या झाडाला आग लागल्याचे दिसून आले होत़े आग लागल्याचे पाहून नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांना संपर्क करून ही माहिती दिली होती़ संबधित अधिका:यांनी अगिAशमन बंब पाठवून आग विझवली होती़ मात्र त्यानंतर गेल्या आठ दिवसात हे प्रकार तालुक्यात जोरात सुरू झाल्याचे दिसून आले आह़े झाडाला आग लावून कोसळलेले झाड तोडून त्याची रात्री अपरात्री विल्हेवाट लावली जात आहे. मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात हे प्रकार होतात़ झाडाचे खोड उन्हाळ्यात शुष्क होत असल्याने आग लावल्याच्या काही वेळात ती फोफावत असल्याने हे प्रकार वाढत आहेत़ (वार्ताहर)